केज  | वार्ताहर
कोरोनामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहेत, यातच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आँनलाईन अद्यापना बरोबरच शासनाने दिलेल्या जबाबदार्या स्विकारून कोरोना काळात जिवाची पर्वा न करता समाजहित जोपासून वेगवेगळ्या भुमिका चोख पार पाडत आहेत. त्यांचे या काळातील कार्य कौतुकास्पद असल्याचे मत केज येथील गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे यांनी रोटरी क्लब केजच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

 रोटरी क्लब ऑफ केज द्वारा आयोजित 'नेशन बिल्डर' आदर्श राष्ट्रनिर्माता शिक्षक-शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा दि. १९ रोजी दिमाखात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर केजचे गटशिक्षणाधिकारी श्री सुनील केंद्रे, केज रोटरीचे विद्यमान अध्यक्ष बापूराव सिंगण व सचिव अरुण अंजान यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीमती नयना शिंदे, श्रीमती सावित्रा श्रीमंगले, श्रीमती सुरेखा चौधरी, श्रीमती महादेवी फुलसुरे, श्रीमती दीपाली केजकर, श्री प्रमोद शिंदे, विक्रम डोईफोडे, बालासाहेब चाटे, शंकर तारळकर, शिवशंकर जाधव व वसंत तरकसबंद इत्यादी शिक्षक-शिक्षिकांना *नेशन बिल्डर* आदर्श राष्ट्र निर्माता शिक्षक-शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्षय शेटे यांनी केज रोटरीच्या कार्याचा आढावा आपल्या भाषणातून घेतला.  शिक्षक हे समाज व राष्ट्रनिर्मितीचे महत्वाचे माध्यम आहेत. चांगल्या शिक्षकावरच चांगल्या राष्ट्र व  समाज निर्मितीची स्वप्ने पाहिली जाऊ शकतात. शिक्षकांच्या कामाचे कौतुक सार्वजनिक विचारपीठावर झाल्यास त्यांचा उत्साह व मनोबल वाढते. म्हणून केज रोटरीचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी जीवनविषयक सुंदर विचारही मांडले. केजचे गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी ही केज रोटरीच्या कार्याची प्रशंसा केली व यापुढे केज रोटरी आणि तालुका शिक्षण विभाग यांनी आपसांत समन्वय ठेवून अधिक चांगले कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी केज रोटरी व साई केबल टीव्ही नेटवर्क द्वारा आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धा 2021 चे पारितोषिक वितरण ही पार पडले. या स्पर्धेत श्रीमती सावित्रा शिवशंकर तपसे व वर्षा केशव राख यांना दोन हजाराचे रुपये व प्रशस्ती पत्र विभागून प्रथम पारितोषिक, शीतल उपेंद्र शिंदे व ज्योती विजय अंधारे यांना द्वितीय दीड हजार रुपये व प्रशस्ती पत्रासह विभागून द्वितीय पारितोषिक, स्वाती सुरेश कांबळे यांना पाचशे रुपये व प्रशस्ती पत्र तृतीय पारितोषिक तर दोनशे एकावन्न रुपये व प्रशस्ती पत्राची विशेष पारितोषिके श्रीमती आरती विनायक लोखंडे, श्रीमती सुनीता अनिल सत्वधर व श्रीमती ज्योती अमरसिंह वरपे यांना देण्यात आले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हनुमंत भोसले यांनी केले.सूत्रसंचालन सूर्यकांत चवरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव अरुण अंजान यांनी मानले. कार्यक्रमासाठी रोटरी अध्यक्ष बापूराव सिंगण प्रवीण देशपांडे, विकास मिरगणे, महेश जाजू, डी एस साखरे,  दादा जमाले पाटील, हारून भाई इनामदार,  सीता बनसोड, दत्तात्रय हंडीबाग, धनराज पुरी, अरुण नगरे व श्रीराम शेटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.