केज । वार्ताहर
बीड जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पदी केज येथील युवा नेते निलेश( बबलू) साखरे यांची श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी नियुक्ती केली आहे. बीड जिल्हा वंचित आघाडी युवा जिल्हाध्यक्ष पदी माझी निवड केल्याबद्दल श्रध्देय.बाळासाहेब आंबेडकर , प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा,प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,निरीक्षक अक्षयजी बनसोडे यांचे मनस्वी आभार मानतो.या पुढील काळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात युवकांची संघटनात्मक बांधणी करून पक्ष बळकट आणि मजबूत करून माझी जबाबदारी प्रामाणिक पणे पार पाडण्याचा मी प्रयत्न करील. माझ्या वर विश्वास दाखवल्या बद्दल वंचित बहुजन युवा आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानतो. अशी प्रतिक्रिया निवड झाल्यानंतर निलेश साखरे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी बीड यांनी व्यक्त केली.नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष निलेश केशव साखरे यांचे मुळगाव केज तालुक्यातील सौंदना हे असुन ते केज मध्ये गेल्या विस वर्षापासून वास्तव्यास आहेत. त्यांनी अनेक वेळा वंचित बहुजन समाजातील लोकांसाठी रस्त्यावर उतरून न्याय देण्यासाठी अंदोलन केले आहे. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कोरोना महामारिच्या काळात त्यांनी अनेक गरजुवंत कुटुंबांना आर्थिक तसेच जीवनावश्यक कीटचे वाटप केले आहे. मास्क व सॅनिटाइजर चे वाटप ही अनेक वेळा त्यांनी केले आहे.
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी नक्कीच न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असेल व वंचित बहुजन आघाडी पक्षाचा विस्तार सर्व ग्रामीण व शहरी भागात करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिवसरात्र मेहनत घेऊन समाजातील वंचित बहुजन घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असेल. निलेश साखरे,वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष बीड
Leave a comment