युवनेते शेख सर्फराज यांचा असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश
बीड | वार्ताहर
बालेपीर भागातील युवानेते शेख सरफराज यांच्या प्रवेशामुळे आणि या भागातील नगरसेवकांच्या एकजुटीमुळे बालेपीरचा विकासाचा मार्ग आता खुला झाला आहे जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे असते, आम्ही जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून जो दे उस्का भला जो ना दे उस्काभी भला या भावनेने लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे कर्तव्य करत आहोत असे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केले
आज बालेपीर भागातील एम आय एम चे युवा नेते शेख सरफराज व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला असून यावेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर दिनकर कदम, विलास बडगे,नगरसेवक शेख सादिक, इसा चाऊस आदी उपस्थित होते
यावेळी शेख बाबा म्हणाले, की हक्काने जे मागावे ते पूर्ण करण्याची ताकद अण्णासाहेब व अध्यक्ष साहेब यांच्यात आहे जी कामे करून घ्यायची आहेत ती केवळ हेच नेतृत्व करू शकतात, आतापर्यंत आम्हाला केवळ खेळवत ठेवण्यात आले होते मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती पण निवडून येऊनही आमदारांनी इकडे लक्ष दिले नाही, त्यांना कामच न करता फक्त आमदारकी मिळवायची होती,सर्वात जास्त विकास कामे हे केवळ बालेपीर भागात झाली आहेत नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या माध्यमातून ही कामे झाली असून यापुढे आम्ही आण्णासाहेब आणि अध्यक्ष साहेब यांच्या बरोबरच राहू असे सांगून त्यांनी बालेपीर कबरस्थान साठी जागा उपलब्ध करून द्यावी व गोरगरीब जनतेला नवीन स्वस्त धान्य दुकान मंजूर करून घ्यावे तसेच या भागातील वाढीव वस्ती मध्ये 5 नवीन फुला ची कामे हाती घ्यावेत अशी मागणी केली
यावेळी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, आज पासून इनकमिंग सुरू झाली आहे याचे कारण शहरात होत असलेला विकास आता जनतेच्या नजरेस पडू लागला आहे, विकासाची कामे ही केवळ जनतेला समोर ठेवून केले असून कुठलाही भेदभाव न करता शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे बालेपीर म्हणजे आमचे घर आहे कुटुंब आहे या भागात अनेक विकासाची कामे झालेली आहेत, वाढिव-वस्ती मध्ये देखील जी कामे बाकी आहेत ती पूर्ण करून दाखवू कुणी दिले न दिले तरी आणि मात्र देत राहणार या स्वर्गीय काकूंच्या शिकवणीवरच आम्ही बीडकर यांची सेवा करत आहोत असे ते म्हणाले
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, मी शब्दावर विश्वास ठेवणारा असून या भागातील जनतेने आज जो शब्द दिला आहे तो पूर्ण करतील असा माझा विश्वास आहे मोठ्या पावसात देखील कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो, येत्या काळात प्रत्येक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन कामे केली जातील बालेपीरचा विकासाचा मार्ग आता खुला झाला आहे शेख सरफराज आणि या भागाचे नगरसेवक शेख सादिक हे जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेत आहेत आम्ही जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत या भावनेने जो दे उस्का भला ना दे उस्काभी भला या भावनेने लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य करत आहोत जनतेशी प्रामाणिक राहून कामे केली तर जनता नक्कीच पाठीशी उभी राहते सर्वसामान्य माणसाला अडचणीतून बाहेर कसे काढता येईल हे पाहणे महत्त्वाचे असते बीडची जनता आमच्यावर विश्वास ठेवणारी आहे हे झाले ते झाले पण जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगून त्यांनी सरफराज आणि असंख्य कार्यकर्त्यांचे स्वागत केले
Leave a comment