परळी । वार्ताहर
परळी शहरातील सर्व किराणा व्यापारी, कापड व्यापारी, आडत व्यापारी, नाभिक व्यावसायीक, सोने व चांदी व्यापारी, मेडीकल व्यापारी, भाजीपाला व फळ विक्रेते आदींसह सर्वच व्यापार्यांना अॅन्टिजेन टेस्ट बंधनकारक असुन टेस्ट न केल्यास सोमवार दि.28 जूनपासुन अनिश्चित कालावधीसाठी दुकाने सिल केली जाणार आहेत. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजुळ व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी म्हटले आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता विविध यंत्रणेने वर्तवली आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन विविध व्यवसाय करणार्या व्यापार्यांची अन्टीजन टेस्टचा उपक्रम आता हाथी घेतला असुन अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी आदेश निर्गमित केला आहे. राज्य शासनाने कोरोना विषाणूमुळे कोव्हीड-19 या साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 मार्च, 2020 पासून लागू केला आहे. त्या अर्थी परळी तालुक्यात शहरी व ग्रामिण भागात संभाव्य येणार्या कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या अनुषंगाने कोव्हीड-19 च्या प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून परळी तालूक्यातील सर्व व्यापारी किराणा व्यापारी, कापड व्यापारी, सोने-चांदी व्यापारी, आडत व शेती विषयक व्यापारी मेडिकल व्यापारी (दुकानदार), सर्व भाजीपाला व फळ विक्रेते, इतर सर्व प्रकारचे व्यापारी यांनी 26 जून व 27 जून दोन दिवसात सकाळी 10 ते सायं. 5 वाजे पर्यंत आपली अॅन्टीजन टेस्ट कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नट रंगमंदिर येथे करून घ्यावी.तसेच अॅन्टीजन टेस्ट केल्याबाबतचे प्रमाणपत्र हस्तगत करावे अॅन्टीजन टेस्ट न केल्यास आपली दुकाने सोमवारी दि.28 जून 2021 पासुन अनिश्चित कालावधीसाठी सिल करण्याबाबत तसेच आपल्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे परळीच्या उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सुरेश शेजुळ व परळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी परळीच्या नागरीकांना आवाहन केले आहे.
Leave a comment