आणीबाणीने देशाला काळिमा फासला-राजेंद्र मस्के
बीड । वार्ताहर
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी25 जून 1975 रोजी राजकीय द्वेषातून संपूर्ण भारत देशात आणीबाणी लादली. सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण देशात तुरुंगाची परिस्थिती निर्माण केली. स्वतंत्रपणे जगण्याचा आणि मत मांडण्याचा अधिकार आणीबाणीने हिरावून घेतला. घटनाबाह्य आणीबाणीला विरोध करण्यासाठी जयप्रकाश नारायण,अटलबिहारी वाजपेयी,प्रमोद महाजन,गोपीनाथराव मुंडे यांच्यासह मान्यवर नेते आणि हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले. लोकशाहीची मूल्य आणि सामान्य जनतेचा स्वातंत्र्याचा अधिकार आबाधित ठेवण्यासाठी देशभरात मोठी चळवळ उभी राहिली. आणीबाणीने लोकशाहीला काळिमा फासला असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले.
25 जून भारतीय जनता पार्टीतर्फे काळा दिवस पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून या आणीबाणी दरम्यान तुरंगवास भोगलेल्या देशप्रेमी नागरिकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी या आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला असे लोकतंत्रसेनानी माननीय सत्यनारायणजी लोहिया,विजयकुमार पालसिंगणकर,नरसिंह कुरपुडे यांचा सत्कार संघर्षयोद्धा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बीड येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमास नवनाथ अण्णा शिराळे प्रा.देविदास नागरगोजे, अजय सवाई, सलीम जहांगीर, चंद्रकांत फड, भगीरथ दादा बियाणी, डॉ. लक्ष्मण जाधव, प्रमोद रामदासी, गणेश पुजारी, शांतिनाथ डोरले, फारुख भाई, अनिल चांदणे, विठ्ठल ठोकळ,हरीश खाडे, दत्ता परळकर, छाया मिसाळ, मीरा गांधले, कांता बांगर, विलास बामणे, संग्राम बांगर, शरद झोडगे, केशव बडे, भूषण पवार, राजेश चरखा, नरेश पवार, महावीर जाधव, पंकज धांडे, अनिल शेळके, बद्रीनाथ जटाळ, समीर शेख,भास्कर सालपे, दिपक थोरात आदी उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण लोहिया व विजयकुमार पालसिंगणकर यांनी आणीबाणी काळातील प्रेरणादायी अनुभव मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नागरगोजे यांनी केले आणि आभार प्रदर्शन अजय सवाई यांनी केले.
Leave a comment