खरीप हंगामासह कोरोना स्थितीची आढावा बैठक सुरू
बीड । वार्ताहर
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज शुक्रवारी (दि.18) दुसर्यांदा बीडमध्ये दाखल झाले आहेत.
सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाकडून सुरु असलेली खरीप हंगामाची स्थिती, शेतकर्यांना पीक कर्ज वाटप करण्याबाबत डिसीसीसह राष्ट्रीयकृत बँकांना दिलेले उद्दीष्ट आणि 15 जून पर्यंत झालेले कर्ज वाटप या सर्व विषयांवर आढावा बैठकीत चर्चा होत आहे.
या बैठकीला पालकमंत्री धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, सीईओ अजित कुंभार यांच्यासह आ.संदीप क्षीरसागर, आ.संजय दौड, विजयसिंह पंडित , व पदाधिकारी उपस्थित आहेत.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना व तिसर्या लाटेच्या अनुषंगाने केलेले नियोजन या सार्या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत. दरम्यान प्रशासकीय बैठकीनिमित्त उपमुख्यमंत्री बीडमध्ये दाखल होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीची कालपासून तयारी केली जात होती.
Leave a comment