जिल्ह्याधिकार्‍यांनी काढले नवे आदेश

बीड । वार्ताहर

जिल्हा प्रशासनाने निर्बंधामध्ये काहिशी सुट दिल्यानंतर आणि दिवसभर दुकाने उघडे ठेवण्यास परवानगी दिल्यानंतर बीड शहरासह अंबाजोगाई, परळी, गेवराई आदि शहरात जी गर्दी उसळत आहे त्यामुळे कोविडच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. गर्दीमध्ये मास्क वापरणार्‍यांचे प्रमाणही कमी होत चालले असून पुन्हा कोरोनाचा धोका निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यावर लॉकडाऊनचे सावट निर्माण होवू शकते अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आता तरी विनाकारण गर्दी न करता कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत जिल्हामध्ये कोवीड 19 च्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार लेवल -3 चे निर्बंध लागु आहेत सदरील  निर्बंधामध्ये अत्यावश्यक तसेच इतर सेवा देणार्‍या आस्थापना दैनंदिन सुरु असल्याने जिल्हयातील विविध शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर वर्दळ वाढलेली दिसुन येत आहे . जिल्हा आरोग्य यंत्रणेकडुन दैनंदिन प्राप्त होणार्‍या दैनिक अहवालावरुन असे निर्दशनास येते की , जिल्हयामध्ये दि . 10.06.2021 रोजी 168 रुग्ण , दि . 11.06.2021 रोजी 130 रुग्ण , दि . 12.06.2021 रोजी 180 रुग्ण , दिनांक 13.6.2021 रोजी 108 रुग्ण व दि . 15.06.2021 रोजी 154 रुग्ण कोवीड रुग्ण आढळुन आलेले आहेत . सद्यस्थितीत निर्बधामध्ये शिथीलता असल्या कारणाने शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक कोवीड योग्य वर्तन  चे पालन करत नसुन बाजारपेठांमध्ये विनाकारण फिरत असल्याने , शासकीय कार्यालयामध्ये समुहांमध्ये गर्दी करत असल्याने , आवश्यकता नसताना रस्त्यांवर समुहांमध्ये उभे राहणे , मास्क चा वापर न करता बाहेर फिरणे इ . कारणांमुळे रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे . सद्यस्थितीत बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतर  , सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर कमी प्रमाणात करत असुन यामुळे भविष्यात पुन्हा कडक  निर्बंधाची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही . सबब जिल्हयातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की , सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे , शहरांमधील बाजारपेठांमध्ये आवश्यकता असेल तर बाहेर पडावे , सर्व आस्थापनाधारकांनी त्यांच्या आस्थापनांमध्ये सामाजिक अंतर , सॅनिटायझर चा वापर व मास्कचा वापर आवश्यक करावा . नागरिकांनी विनाकारण गर्दीमध्ये जाणे टाळावे , सरकारी कार्यालयांमध्ये विनाकारण समुहांमधील वावर टाळावा. रेस्टॉरंट , हॉटेल या केवळ 50 टक्के उपस्थितीमध्येच निर्देशित केलेलया वेळेत चालु ठेवण्यात याव्यात . अन्यथा संबधित रेस्टॉरंट , हॉटेलवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल . यापुढे रुग्ण संख्यावाढीचा आलेख वाढत राहिल्यास , नागरिकांना कठोर नियमांना सामोरे जावे लागेल तसेच कोवीड -19 विषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निर्दशनास आल्यास संबधितांवर शासन नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येईल याची नोंद घ्यावी . सर्व व्यापारी वर्गानी निर्देशित केलेल्या वेळेत दुकाने उघडावी तसेच संध्याकाळी 05.00 नंतर अत्यंत आवश्यकता असेल तरच ( वैद्यकीय कारणास्तव ) घराबाहेर पडावे . संध्याकाळी 05.00 नंतर संचारबंदी लागु आहे याचे देखील सर्व नागरिकांनी भान ठेवावे . रुग्ण संख्या , रुग्ण वाढीचा दर  वाढल्यास शासन निर्देशांनुसार जिल्हा जर स्तर 3  मधुन स्तर 4  मध्ये गेल्यास सर्व नागरिकांना पुन्हा कडक निर्बधाना सामोरे जावे लागेल याची नोंद सर्वांनीच घ्यावी . असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे .

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.