बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड
आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. रोहिणी नक्षत्र संपताच जोरदारपणे पावसाच्या सरी बरसल्या.यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण झाले असून बाजारपेठेत बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कडा, आष्टी ,धानोरा धामणगाव या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत.
शनिवारी सायंकाळच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढग जमा होऊन साधारणपणे आठ वाजण्याच्या सुमारास आष्टी तालुक्यामध्ये मान्सूनच्या सरी कोसळल्या.या मान्सूनच्या सरी बऱ्याच वर्षानंतर रोहिणी नक्षत्रात बरसल्याने शेतकरी वर्गाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत .लॉकडाऊनमध्ये शेतकरीवर्गाने मान्सूनपूर्व शेतीची कामे अगोदरच करून ठेवलेली असून पावसाची वाट पाहत तो पेरणीची लगबग सुरु केली आहे पेरणी साठी लागणारे बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी वर्ग कृषी दुकानांमध्ये गर्दी करू लागला आहे तूर बाजरी उडीद मूग सोयाबीन कापूस इत्यादी पिकांच्या बियाण्याची विक्री सुरू झाली असून यावर्षी सर्वच बियाणांच्या किमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित मात्र कोलमडणार आहे शेतकरीवर्गाने मान्सून पूर्व काळात शेतीची कामे उरकून घेतलीअसून आता फक्त आणखी एक किंवा दोन मोठे पाऊस येताच पेरणीला सुरुवात करणार आहे.
तालुक्यात उडीद बियाणांची टंचाई निर्माण झाली असुन शेतकरी वर्ग ठराविक कंपनीच्या वाणाची मागणी करत असल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. म्हाबीज व निर्मल या दोनच उडीद वानांना मागणी आहे.इतर वाण देखील सुधारित असून शेतकऱ्यांनी वेगवेगळे बियांने वापरावे असे आवाहन कृषी दुकानदारांनी केले आहे..
गेल्या तीन चार वर्षांपासून कापूस पिकांवर बोंड अळीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने व दिवसेंदिवस कापसाचा उतारा कमी होताना दिसत आहे .त्यामुळे यंदा मात्र शेतकऱ्यांनी कपासीकडे पाठ फिरवली असून डाळवर्गीय पिकांकडे जास्तीचा कल दिला आहे,
Leave a comment