निवृत्त होण्यापूर्वी मंडळाधिकारी

परमेश्वर राख यांचा प्रताप

 

बीड । वार्ताहर
शहरातील बीड तरफ गिराममधील सारंगपुरा मस्जिदीची इनामी जमिन खालसा करुन त्याचा फेर गेल्या मार्चमध्ये मंजूर करण्यात आला.या जमिनीच्या खालसा प्रकरणाची प्रक्रीया 2018 मध्ये पुर्ण करण्यात आली.या प्रकरणात तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके यांनी हैद्राबाद इनाम निर्मूलन कायद्यानुसार ही प्रक्रीया पुर्ण केल्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र यामध्ये पुर्णत: अनियमितता झाली होती. असे असतानाही मार्चमध्ये याचा फेर मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे  मंडळाधिकारी परमेश्वर राख हे न्युमोनिया आजारामुळे शहरातील लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल झाले होते. ते 31 मार्च रोजी निवृत्त होणार असल्याने कोरोनाच्या साथीमध्येदेखील त्यांनी लोटस हॉस्पीटलमध्ये हा फेर मंजूर केला. तलाठी बी.ए.तांदळे यांनी या सर्व प्रकारात महत्वाची कामगिरी बजावली. यामध्ये देखील बोगस आदेशाव्दारेच हा जमिन खालसा प्रक्रीया पुर्ण केल्याचे उघडकीस आले आहे.



शहरातील सारंगपुरा मस्जिदला 10.87 हेक्टर इनामी जमिन असून या जमिनीचे इनामदार रोशन अली मुनावर अली यांच्या सहीचा बोगस वहिवाट करार करुन पंडित मुक्ताराम पिंगळे, बापुराव शंकर मस्के, पांडुरंग दशरथ हाडुळे, तुळशीराम गणपतराव धपाटे यांचे इतर हक्कात नावे घेवून सर्वे नं. 128 मधील हे क्षेत्र मदतमाश इनाम जमिन दाखवून वरील पाच जणांची महसूल अभिलेखात मालकी रकान्यात नावे लावण्यात गेली. तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके यांनी 6 मार्च 2018 रोजी या संदर्भात अर्जदाराचा अर्ज मंजूर करत इतर हक्कामध्ये पाच व्यक्तींचे ज्यामध्ये अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडुळे आणि उध्दव धपाटे यांची नावे इतर हक्कात घेण्यास मंजुरी देत प्रतिबंधित मालक म्हणून नोंद घेण्याचे आदेश दिले होते. मंडळाधिकारी राख यांनी 23 मार्च 2021 रोजी याचा फेर क्रमाक 20672 मंजूर केला. विशेष म्हणजे ते यावेळी बीड शहरातील लोटस हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमिट होते. रुग्णालयात असतानाही फेर मंजूर कसा केला? याची चर्चा होत असून या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.