पाटोदा । वार्ताहर
शहरातुन जात असलेल्या, पैठण ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला चिटकून महसूल विभागाचे शासकीय गोदाम आहे.या गोदामाच्या आवारात गेल्या आठ दिवसांपासून, अतिक्रमण करून काम सुरू होते. याबाबतीत दिनांक एकतीस मे सोमवार रोजी पाटोदा तहसीलदार यांनी, पंचनामा करुन अतिक्रमण काढून टाकण्यास सांगितले होते मात्र सदरील अतिक्रमण धारकाने अतिक्रमण न काढल्यामुळे आज दिनांक एक जुन रोजी महसुल, नगरपंचायत,पोलीस प्रशासनाच्या उपस्थित हे अवैध अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आले.
गेल्या आठ दिवसांपासून चालु असलेल्या कामा संदर्भात, महसुल प्रशासन काय पाऊल उचलते या कडे पाटोदा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते, आज एक जुन रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास महसुल प्रशासनाचे अधिकारी, नगरपंचायत प्रशासन पोलिसांचा ताफा या परिसरात दाखल झाला, व जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली ही कारवाई तब्बल दोन तास चालू होती.याबाबतीत अतिक्रमण धारक शशिकांता नारायणकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की या जागेवर माझे दोन हजार तीन पासून दुकाने होते पैठण ते पंढरपूर या रस्त्याच्या कामा अंतर्गत कामाला अडचण नको म्हणून माझे दुकाने काढण्यात आले होते.काम पुर्ण झाले आहे. म्हणून मी दुकान बांधण्यास सुरुवात केली होती. माझ्याजवळ दोन हजार तीनचे लाईट बील आहे. शासनाने हे काम पाडण्या आगोदर मला कोणत्याही, प्रकारची कल्पना देण्यात आली नाही . तर पाटोदा तहसीलदार रमेश मुंडलौड म्हणाले की, एकोणीसशे पन्नास पासून हि जागा, महसूलच्या शासकीय गोदामाची आहे,त्यामुळे जागा आमची असल्यामुळे, नोटीस देण्याची आम्हाला गरज नाही,ही मोहीम राबविताना बाधा येऊ नये यासाठी, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता,यावेळी,तहसीलदार रमेश मुंडलोड,पोलीस निरीक्षक महेश आंधळे, पोलिस कर्मचारी,नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुनील ढाकणे,सुनील शिंदे,मंडल अधिकारी बडे, तलाठी बी.जी.नागरगोजे व अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.
Leave a comment