बीड । वार्ताहर
सेवाज्येष्ठतेनुसार वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पोलीस अंमलदारांना 25 टक्के कोट्यातील रिक्त जागांवर उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी सोमवारी (दि.31) याबाबतचे आदेश जारी करत राज्यातील 619 जणांना उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती करण्यात आली. यात बीड पोलीस दलातील 11 हवालदारांचा समावेश आहे.
दादासाहेब केदार, जीवराज हंगे, भाऊसाहेब सुस्कर, महादेव ढाकणे, बाबासाहेब जायभाये, तुकाराम बोडखे, नंदकुमार ठोंबरे, शिवशंकर चोपणे, विजय जाधवर, शफीक अब्दुल गफूर सय्यद, देविदास आवारे अशी पदोन्नतीने उपनिरीक्षक झालेल्या अंमलदारांची नावे आहेत. 2013 मध्ये पदोन्नतीसाठी परीक्षा झाली होती. यातील उत्तीर्ण अंमलदारांना सेवाज्येष्ठता व निवडसूचीप्रमाणे उपनिरीक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यातील 90 टक्के अंमलदार आगामी दोन ते पाच वर्षांत सेवानिवृत्त होणार आहेत. उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळालेल्या जिल्ह्याील 11 अंमलदारांचे पोलीस अधीक्षक आर.राजा, अपर अधीक्षक स्वाती भोर, सुनील लांजेवार, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी स्वागत केले आहे.
Leave a comment