कृषी उत्पन्न बाजार समित्या 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रूग्णांची संख्या घटू लागल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने लागू केलेले 31 मे पर्यंतचे कडक निर्बंध शिथिल केले आहेत. उद्या दि.1 जून 2021 पासून अत्यावश्यक सेवेत मोडणार्या काही आस्थापना काही तासांसाठी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांंनी यासंबंधीचे आदेश सोमवारी (दि.31) सायं.5 जारी केले आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार उद्या दि.1 ते 15 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व औषधालये, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकिय विमा कार्यालय, फार्मास्टुटिकल्स व कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा ज्यात सहाय्यक उत्पादन व वितरण युनिट, त्यांचे डिलर्स, वाहतूक व पुरवठा साखळी, लसीचे उत्पादन व वितरण, सॅनिटायजर्स, वैद्यकिय उपकरणे, पेट्रोल पंप, टपाल सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवेत मोडणार्या आस्थापना पुर्ण वेळ सुरू राहतील.
तसेच 1 जून ते 15 या कालावधीत जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटण विक्रीचे दुकाने, बेकरी संबंधीत दुकाने या सर्व आस्थापना सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत सुरू राहतील. तसेच शनिवारी व या सर्व आस्थापना पुर्णवेळ बंद राहतील. गॅस वितरण दिवसभर सुरू राहील. दुुध विक्री प्रत्येक दिवशी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत सुरू राहील. जिल्ह्यातील सर्व बँका, ग्राहक सेवा केंद्राचे कामकाज 31 मे पासून शासनाच्या नियमित वेळेप्रमाणे पुर्णपणे सुरू राहील. शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत नियमितपणे सुरू राहतील. लसीकरणासाठी 45 वर्षापुढील व्यक्तींना मॅसेज आला आहे. त्यांनाच लस घेण्यासाठी जाता येईल. कृषी व्यावसायाशि संबंधीत सर्व दुकानांच्या मालकांना आलेले बि-बियाणे, खते व औषध केवळ गोडाऊनला व दुकानाला उतरून घेण्यास मुभा असेल. तसेच कृषी विक्रेत्यांना, शेतकर्यांना बियाण-खते व औषध विक्री आणि खरेदीस पुर्ण वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार रविवारी सुध्दा ही दुकाने विहित वेळेत सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत राहील. नरेगाची कामे सुरू राहणार असून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच लाभार्थ्यांना धान्य वितरित करता येईल. जिल्ह्यातील सर्व दारूचे दुकाने पुर्णवेळ पुर्णपणे बंद राहतील. तसेच पुरवठा केल्या जाणार्या वस्तुंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाही. परंतू दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमाचा भंग केल्यास सदर दुकान कोरोना साथ अधिसुचना संपत नाही तोपर्यंत बंद करण्यात येईल तसेच दंडही आकारण्यात येईल असे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
Leave a comment