कोरोना काळात शेतकऱ्यांना दिलासा- माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे हस्ते मोफत चारा बियाणे वाटप.
बीड । वार्ताहर
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( NDDB ) यांचे केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत बीड तालुका दुध व्यावसाईक सहकारी संस्थांचा संघ म, बीड यांचे मार्फत मोफत तीन हजार दुध उत्पादक शेतकऱ्यांना मका 5 किलो व ज्वारी 3 तीन किलो चारा. बियाणे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे हस्ते मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात दुध उत्पादकांना याचा मोठा हातभार लागणार आहे. बीड तालुका दुध संघ व NDDB यांचे सहकार्याने 110 क्विंटल चारा बियाणे संघ कार्यस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. एकीकडे कोरोना महामारी व त्यात सर्व बाजारपेठा बंद तसेच लॉकडाऊन असल्याने दुध व्यवसाय खूप अडचणीत आला आहे. 30 रु. प्रती लिटर मिळणारा भाव 20 ते 22 रु. प्रती लिटर वर आला आहे.त्यामुळे दुध उत्पादक अडचणीत सापडला आहे.
पशुखाद्याचे दर दुध दराच्या हिशोबाने आवाक्याच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे दुध धंदा परवडणारा राहिलेला नाही चारा बियाणे जनावरे जगविण्यासाठी चांगला उपयोग्य मिळणार आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या चार्यामुळे उत्पादकांना
दिलासा मिळणार आहे. या योजनेंतर्गत सर्व दुध उत्पादक शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी केले आहे.
यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज मंजरीकर, चेरमन विलास ( बापू ) बडगे, प्रा जगदीश काळे, दिनकर कदम,अरुण डाके, नानासाहेब काकडे, सखाराम मस्के, सुभाष क्षीरसागर, सानप चंद्रकांत, मनोज पाठक,सर्जेराव खटाने,नवनाथ कुलकर्णी, जगन्नाथ मोरे, बाबासाहेब खिल्लारे, नवनाथ राऊत, महेश सिंगन, कोळेकर , ह.भ.प. कुटे महाराज,कल्याण खांडे, घोडके व संघाचे कार्यकारी संचालक संतोष श्रीखंडे उपस्थित होते.
Leave a comment