जिल्हा रूग्णालयात झाली मारहाण;डॉक्टरची सीएसकडे तक्रार

बीड । वार्ताहर

शहरातील चर्‍हाटा फाटा परिसरात डीवायएसपी व त्यांच्या पोलीसांकडून आष्टी तालुक्यात कार्यरत असणार्‍या एका डॉक्टरला झालेली मारहाणीची घटना ताजी असतानाच बुधवारी (दि.26) बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एका बालरोगतज्ञ असलेल्या डॉक्टरला पोलीसांनी काठीने मारहाण करत चौकीत नेले. दरम्यान संबंधित डॉक्टरने याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली आहे. या प्रकाराने आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये पोलिसांबद्दल रोष व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले डॉ.सुरज बांगर हे बुधवारी ऑन कॉल होते. सकाळी 10 वाजेच्या सुमारास ते जिल्हा रूग्णालयात आले. त्यांना मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवित ओळखपत्राची मागणी केली. डॉ.बांगर यांनी ओळखपत्र गळ्यात ठेवण्याऐवजी खिशात ठेवले. आतमध्ये जाण्यावरून पोलिस आणि डॉक्टरमध्ये शाब्दीक वाद झाले. त्यानंतर या डॉक्टरला चार पाच पोलिसांनी चौकीत नेऊन मारहाण केली. हा प्रकार बांगरने तात्काळ वरिष्ठांना कळविला. याबाबत तक्रार लिहून त्यांनी जिल्हाधिकारी अथवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणे अपेक्षित होते. परंतू जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे व्हॉटस्पवरून तक्रार केली. त्यामुळे घटनास्थळी नेमके काय घडले, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
याबाबत डॉ.सुरज बांगर यांना विचारले असता ते म्हणाले, माझी ऑन कॉल ड्यूटी असल्याने सकाळी 10 वाजता गेलो. गेटवर मला पोलिसांनी अडविले. मी खिशातील ओळखपत्र काढेपर्यंत पोलिसांनी मला चौकीत नेले व मारहाण केली. मी वैयक्तीक तक्रार करणार नाही. सीएसकडे तक्रार पाठविली आहे. रूग्णालय प्रशासनाने यावर तक्रार करावी.दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांनी मारहाण झाल्याचे मान्य करत याबाबत आरएमओ डॉ.राठोड यांना पाहायला सांगितले आहे. नेमका काय प्रकार घडला, हे पहावे लागेल अशी प्रतिक्रिया दिली.

मारहाण झालीच नाही-पो.नि.सानप

याबाबत शहर ठाण्याचे निरीक्षक रवी सानप यांनी पोलीसांची बाजू मांडली. डॉक्टरला मारहाण केली नाही. कर्मचारी व डॉक्टरची शाब्दिक चकमक झाली. डॉक्टरने तक्रार दिलेली नाही. मारहाणी झाली असेल तर चौकशी करु असेही त्यांनी सांगीतले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.