आष्टी येथील नामदेव राऊत यांची अशीही माणुसकी
आष्टी । वार्ताहर
गेल्या पंधरा दिवसापुर्वी आष्टी येथे इंजिनियर चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला कोरोना या रोगाची लागण झाली.मुळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जवळा येथील हा तरूण कोरोनाशी लढत असतांना त्याला उपचार घेण्यासाठी पैसै कमी पडले,आष्टी येथील मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेटचे चेरमन नामदेव राऊत यांना त्याची माहिती मिळाली.त्यांनी आष्टीतील उपचार घेत असलेल्या खाजगी हॉस्पीटलमध्ये जाऊन संबंधीत डॉक्टरांना बोलून या मुलाला वाचविण्यासाठी कितीही पैसे लागू द्या मी जमा करून देतो म्हणत ना रक्ताचा..ना नात्याचा..तरीही पळापळ करत सुमारे दोन लाख लोकांचे रूपये जमा केले खरे पण देवाने त्या मुलाला आपल्याकडेच बोलून घेतले.
जामखेड तालुक्यातील जवळा येथील जैन समाजाचा 28 वर्षीय तरूण याला एक महिन्यापुर्वी कोरोना या रोगाची लागण झाली.घरची परिस्थिती हालाकीची असल्याने त्याने दुखणे अंगावरच काढले.नंतर जास्त ञास होऊ लागल्याने त्याला बारामती,नगर,बीड येथे उपचार केले.परंतु कठढउ स्कोर 22 आल्याने त्याला व्हेटींलिटरची आवश्यकता होती.त्याला आष्टी येथील खासगी कोव्हीड सेंटरमध्ये उपचाराला आणले त्यावेळे त्या खाजगी रूग्णालयात योगायोगाने आष्टी शहराचे माजी सरपंच नामदेव भाऊ राऊत तेथे आले होते.त्यांनी सदरील रूग्णांची चौकशी केली तर आत्ता आणलेला रूग्ण हा केवळ 28 वर्षाचा आहे.त्याची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.त्याला उपचारासाठी काहितरी मदत करावी लागेल असे नातेवाईकांनी येथे बोलतांना सांगितले.राऊत यांनी रूग्णा जवळ जाऊन चौकशी करत धिर दिला.त्याचा गुगल पे,फोन पे व बॅक खात्याची डिटेल घेतली आणि सोशल मिडियावरून त्याला मदतीची विनंती केली.दोन ते तीन दिवसात दोन लाख रूपये जमा झाले त्यांच्या जवळचेही पैसे टाकले डॉक्टरांना विनंती करत सांगितले कितीही पैसे लागू द्या पण याचा जीव वाचला पाहिजे पण नियतीला दुसरेच मान्य होते.नामदेव भाऊंच्या प्रयत्नाला यश नाही आले पण एक माञ नक्की की कोरोनाच्या या भयान काळात अजूनही माणूसकी जिवंत आहे.
Leave a comment