राजरोसपणे चालू आहे वाळू तस्करी
आष्टी । वार्ताहर
तालुक्यातील चिखली,टाकळसिग, सांगवी आष्टी ,या ठिकाणी नदीपात्राच्या जमिनीत मोठ्या मशनरीच्या साह्याने दर दिवसाला हजारो ब्रास वाळू उपसली जाते. हे सगळे तहसीलचे महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन डोळे असून आंधळे होण्याचे सोंग घेत आहेत.हे जनतेला काय समजत नाही काय? भल्या पहाटेपासून राञीपर्यत खडकत रोडने आष्टी शहरांमध्ये टिप्पर ,ट्रॅक्टर दहा चाकी हायवा ,अशा मोठमोठ्या वाहनांमध्ये दिवसाढवळ्या भल्या पहाटे पासून राजरोसपणे वाळू विकली जाते.
आष्टी तालुक्यातील वाळु शेजारच्या तालुक्यात जिल्हायात देखील विकली जातीय हे कशामुळे घडतंय कारण डोळे असून आंधळे होण्याचे सोंग आनतायत आष्टीचे तहसिल व महसुलप्रशासन घेत आहेत .आष्टी शहरातील खडकत रोडणे पहाटे 5
वाजल्यापासून या वाळूच्या ट्रॅक्टर , टिप्पर भरधाव वेगाने आष्टी शहरात दाखल होतात. या रोडवर रहदारी करणारांना सकाळच्या दूध व्यवसायिकांना आपला जीव मुठीत घेऊन त्या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. कारण की वाळू वाल्यांच्या गाड्यांची वेग एवढा भरधाव असतो एवढे आहे कधी कुणाच्या अंगावर येतील हे सांगता येत नाही. यापूर्वीही दोन तीन प्रकार असे घडले आहेत,कीत्येक वेळेस यांचे ट्राँक्टर पलटी झाले आहेत यामुळे या रसत्यावर फीरना-या दोन महीला बालबाल बचावल्या तरी देखील यांची मघरोरी एवढी वाढली आहेकी वेळोवेळी पेपरला बातम्या देऊन या धंद्याला या वाळु तस्करीला चाप बसत नाही. उलट वाळू वाले म्हणतात बातम्या अजून द्या रोज द्या आमच्या वाळूचे रेट वाढतात. गेल्या एक महिन्यापूर्वी आष्टी तालुक्यामध्ये संपूर्णपणे लॉकडाऊनच्या अगोदर सलग 15 दिवस वाळूचा धंदा पूर्णपणे बंद होता. सगळ्या वाळूतस्करांची वाहने आपापल्या दारात ट्रॅक्टर टिपर उभी केली होती .मग लाँकडाऊन सुरू झाला काय झाले परत तेवढ्याच जोमाने हा धंदा सुरू झाला यावरून असे लक्षात येते की हे पोलिस प्रशासन व तहसील प्रशासन हा धंदा बंद ही करु शकते करण्याचा जर त्यांनी मानस घेतला तर ते बंदही करू शकतात. हे 15 दिवसाच्या बंद पिरेडने जनतेच्या लक्षात आले आहे. हे बंद का होते याविषयी काही गुप्तहीरा यांमार्फत अशी माहिती मिळाली.या वाळूव्यवसाकडुन हप्ता हा कमी पडत होता. तो हप्ता वाढून घ्यायचा होता .म्हणून हा सलग 15 दिवस वाळू तस्करी बंद केली गेली .मात्र हप्ता वाढून दिल्यानंतर लगेच एकीकडे कोरुना च्यामहामारीने जिल्हाधिकार्यांनी लॉकडाउन पुकारले आणि दुसरी कडे आष्टी चा पोलीस प्रशासनाने वाळू माफियांना मुभा दिली चला परत एकदा वाळूच्या धंद्याला लागा ? ही वाळू तस्करी आणि वाळू उपसा या भागात आणखीन 2सुरु राहिला तर या परीसरात चिमणी पिण्यासाठी पाणी उरणार नाही ?निसर्गाची रास होईल हे लोकप्रतिनिधींच्या का लक्षात येत नाही हा सामान्य जनतेच्या पडलेला प्रश्न पडला आहे.
Leave a comment