आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मंजुरी
आष्टी । वार्ताहर
कोरोना महामारी ची वाढती परिस्थिती पाहता आष्टी तालुक्यामध्ये गेल्या महिन्यापूर्वी कोरोना बाधितांचे संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली होती .यामध्ये ऑक्सीजनचा तुटवडा झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले होते. या गोष्टीचे गांभीर्य आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेऊन आपल्या आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सीजन प्लांट आणण्याचा निर्धार केला. व तो आँक्सीजन प्लान्ट मंजूर करून आज सोमवारी रोजी सकाळी 10 वाजता आष्टी ग्रामीण रुग्णालयांमध्ये भाजपाचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांच्या शुभहस्ते या ऑक्सिजन प्लांटचे शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आमदार बाळासाहेब आजबे जि प सदस्य उद्धव दरेकर तहसिलदार राजाभाऊ कदम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी डाँ शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे,डाँ राहुल टेकाडे, सुनील नाथ आदी उपस्थित होते यावेळी कोरोना महामारीचे परिस्थिती पाहता अगदी मोजक्या लोकांमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. बीड जिल्ह्यामध्ये पहिला ऑक्सीजन प्लांट हा आष्टी तालुक्यामध्ये आष्टी शहरातील ग्रामीण रुग्णालयात होत असून हे आष्टी करांसाठी आनंदाची गोष्ट आहे यावेळी आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की कोरोनाच्या रुग्ण संख्यांचा वाढता आलेख जरी खाली आला असला. सध्या लाँकडाऊन असल्याकारणाने ही संख्या कमी झाली आहे. लाँकडाऊन उठल्यानंतरही संख्या वाढणार आसल्याचे आजबे म्हणाले. तिसरी लाट ही लहाण मुलांसाठी धोकादायक आसल्याकारणाने आधार नावाचे कोव्हीड सेंटर बीडी हंबर्डे महाविद्यालयात उभारले आहे.या कोव्हीड सेंटरमध्ये लहान मुलांनसाठी विशेष व्यवस्था केली .तज्ञ डाँक्टराँची टीम या कोव्हीड सेंटर मध्ये काम करत आहे.याममध्ये लहाण बालकांच्या तज्ञ डाँक्टरांचा समावेश आहे. हे लक्षात घेऊनच आपण सर्वतोपरी कोरोना संबंधित उपाय योजना करण्यास समर्थ आहोत.कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार साहेबराव दरेकर हे होते मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिले. या उद्घाटन कार्यक्रमाला आष्टी पं.स.सभापती व गटविकास आधिकारी यांना आंमञित केले नव्हते.यावेळी परमेश्वर शेळके,नाजीम शेख आशोक पोकळे ताराचंद कानडे ,आतुल शिंदे ,सोनाली येवले,आजिनाथ गळगटे,बांधकाम विभागाचे जोवरेकर उपस्थित होते.
Leave a comment