बीड । वार्ताहर

शहरातील रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून अनाथ निराधार आणि वयोवृद्धांसाठी श्री गुरुदत्त अन्न छत्र चालविले जात असून या माध्यमातून शहरातील साठ लाभार्थ्यांना नियमीतपणे जेवणाचे डब्बे थेट त्यांच्या घरी पोहच केले जात आहे. यामुळे कोरोना संकटाच्या काळात अशा अनाथ, निराधार आणि वयोवृद्धांना रोटरी मिडटाऊनच्या या उपक्रमाचा मोठा फायदा झाला आहे. रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष दिनेश लोळगे आणि त्यांचे सहकारी नियत्यनियमाने हा उपक्रम राबवत आहे. दानशुरांच्या मदतीतून आणि अन्न दात्यांच्या सहकारर्यातून हा उपक्रम राबवला जात असल्याचे दिनेश लोळगे यांनी सांगितले.

बीड शहरामध्ये विविध ठिकाणी, मंदिरासमोर भिक मागणारे भिकारी, निराधार, वयोवृद्ध अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शहरातील काही मोजक्या भागात निराधार वयोवृद्ध आणि अनाथ लोकांना रोजच्या जेवणाची मोठी अडचण असते. पोटाला पोटभर मिळाले तर माणूस कसाही जगू शकतो. ज्याला कोणीही नाही, कुटूंबात कुणी राहिले नाही, कुणाचा आधार नाही आणि मंदिरासमोर बसुन किंवा रस्त्यावर फिरुन भीक मागल्याशिवाय पोट भरणार नाही अशी परिस्थिती ज्यांची आहे. अशा वाईट वेळेतून जे लोक जातात त्यांच्यासाठी आधार बननण्याचे काम रोटरी मिडटाऊनच्यावतीने करण्यात आले आहेे. एखादा दुसरा दिवस नव्हे तर जवळपास 2019 पासून दिनेश लोळगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम चालवला जात आहे. अर्थात असे चांगले काम करण्यासाठी अनेकांची मदत किंवा सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यक असते. रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन या

 

संस्थेच्या माध्यमातून शहरातील निराधार, अनाथ, वयोवृद्ध, गोरगरीब यांच्या पोटाला पोटभर अन्न मिळावे या दृष्टीकोनातून हा प्रकल्प राबवला जात आहे.अनाथ,निराधार आणि वयोवृद्धांना ज्या मध्ये 4 जण अंध आहेत.काही अपंग तर काहीजण आजारी असुन ऐकाच ठिकाणी आजारी असल्यानेअंथरुणावर पडून आहे.बाकी वृद्ध आहेत जेकि बाहेर मागुही शकत नाही आणि कामही करता येत नाही असे आहेत. जेवण द्यायचे म्हणून द्यायचे असे ही नाही या सर्वांना घरचा सारखे जेवण टिफीणमधून घरपोहच दिले जाते. शहरातील अनेक लोक आपल्या वाड वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त, मुला बाळांच्या आई वडिलांच्या वाढदिवसानिमित्त अन्न छत्रला मदत करुन गोरगरीबांसमवेत आपला आनंद वाटून घेतात. निराधारांना, आधार नसलेल्या लोकांना, भिकार्‍यांना पोटभर जेवण दिल्यानंतर त्यांना मदतीचा हात त्यांच्या चेहर्‍यावरील हासु आपल्याला बरेच काही देवून जाते. आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नातूनच हा प्रकल्प राबवला जात आहे. या उपक्रमाचे  प्रकल्प प्रमुख दिनेश लोळगे,मदन काबरा, समीर काझी, राहुल तांदळे, सूर्यकांत महाजन, प्रल्हाद कराळे, अतुल संघानी, आदेश नहार, नितीन गोपन, राजेश बंब,राहुल कुलकर्णी, सुनील पारख,संतोष टवाणी,डॉ.प्रवीण ढगे,डॉ.सुरेंद्र बजाज,डॉ.निलेश जगदाळे,उमाकांत थोरात,भारत शेटे,सुशील सुराणा,प्रकाश मंत्री,संतोष चरखा,जनार्दन दहीवाळ,माणिक परभने, गोविंद कासट श्री.दत्त मंदिर ट्रस्टी यांचाही सहभाग या उपक्रमात महत्वाचा ठरला आहे

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.