रात्रंदिवस न थकता अविरतपणे कार्य सुरू
अडचणीत सापडलेल्या सामान्यांच्या मदतीसाठी प्रसंगी कठोर भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस आता मतदार संघातील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी धाऊन आले आहेत. आ.सुरेश धस विश्वस्त असलेल्या मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघ कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या मदतीने त्यांनी आष्टी-पाटोदा -शिरुर कासार या तीन तालुक्यांत तब्बल 13 कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना केंद्र सुरू करणारे ते बहुदा राज्यातील एकमेव आमदार असावेत, असे बोलले जाते.
या काळात रात्रंदिवस न थकता अविरतपणे धडपडणारा हा नेता, सामान्य माणसाशी कायम नाते ठेवणारा आणि इथल्याशी जिव्हाळा बांधून अविरतपणे या कार्यात आ. सुरेश धस यांनी कोरोना काळात झोकून दिले आहे.मागच्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाले आणि ऊसतोड मजूरांना जिल्ह्यात येण्याचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा त्यांच्या मदतीला धाऊन जाताना भाजपाचे आ.धस यांनी स्वत:वर गुन्हे दाखल झाले तरी पर्वा केली नाही. त्याचबरोबर बिबट्याच्या काळात भयभीत झालेल्या जनतेला सर्वात पुढे येऊन आधार देणारे आ.सुरेश धसच होते.सर्व सामान्य अडचणीत नेहमी तारणहार म्हणून उभे राहणारे नेतृत्व आत्ता कोरीना काळात मदतीचा सामाजिक जनसेवेचा वसा मतदारसंघात 13 कोविड सेंटर चालवीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणतांना आ. सुरेश धस हे पुढाकार घेत आहेत. जिल्ह्यातील पहिला रुग्ण आष्टी तालुक्यात आढळल्यानंतर भितीचे वातावरण निर्माण झाले. परंतु,गाव कंटेनमेंट झोन असतानाही लोकांची भिती दुर करायला ते बाहेर पडले. तेव्हा देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरी लाट सुरु झाली आणि लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्यापार्यांसाठी सविनय कायदेभंगाची आक्रमक भूमिकाही आ.धस यांनी घेतली होती. दुसर्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि सगळ्यांची धावाधाव सुरु झाली. आष्टीच्या रुग्णांना नगर जवळ किंवा जिल्हा रुग्णालयात यायचे म्हटले तर शंभर किलोमिटरहून अधिक अंतर पार करावे लागायचे. रुग्णांचे हाल पाहून पुन्हा आ.धस कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावले.
हजारो रुग्णावर उपचार सुरू
मच्छिंद्रनाथ देवस्थान व आष्टी तालुका दुध संघाच्या माध्यमातून आष्टी मतदार संघातील आष्टी, शिरुर कासार व पाटोदा तालुक्यात त्यांनी आतापर्यंत 13 कोविड केअर सेंटरची उभारणी केली. काही कोविड केअर सेंटरच्या खाटांची क्षमता 50 तर काही कोविड केअर सेंटरची क्षमता 100 तर काही ठिकाणी 150 खाटांची क्षमता आहे.यामुळे साधारण हजारांवर रुग्णांच्या उपचाराची मोफत सोय झाली आहे.आणि अनेक रुग्ण बरे होऊन गेले आहेत. त्यांना तज्ज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळासाठी आरोग्य विभागानेही मदत केली आहे.
आ. सुरेश धसांच्या ‘वॉर रूम’ मधून अनेकांना मदतीचा हात
सोळा दिवसापासून हेल्पलाईन सुरू; 187 जणांना मिळवून दिले बेड
कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची व्यवस्था करतांना नातेवाईकांची प्रचंड तारांबळ उडते. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सुरू केलेल्या 24 ताशी वॉर रूमची 395 जणांना मदत झाली आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर बेडची पुर्तता सोबतच औषध आणि रूग्णवाहिकेची व्यवस्था आमदार धस यांच्या माध्यमातून झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संसर्ग प्रचंड वाढल्यानंतर मार्च आणि एप्रिल महिना अनेकांसाठी वेदनादायी ठरला.अनेकांना रूग्णालयात बेड उपलब्ध झाले नाहीत.बेड मिळाले तर ऑक्सिजन नव्हते, ऑक्सिजन असले तर व्हेटींलेटर नव्हते.काहींना रेमडेसीवीर इंजेक्शनचा पाठपुरवठा होऊ शकला नाही. अशा बर्याच जणांना उपचार मिळू न शकल्याने जीव गमवावा लागला.एकीकडे शासकीय यंञणेचा ताण जास्त वाढल्याने आशा परिस्थितीत रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना कोणाची मदत घ्यावी असा प्रश्न निर्माण होत होता.अशा अपत्कालीन परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी गेल्या सोळा दिवसापुर्वी वार रूमची स्थापना केली होती व 24 तास सेवेत औषधी, बेड, रुग्णवाहिका, अंत्यसंस्कारासाठी व्यवस्था अशा विविध पातळीवर समस्यांचे निरसन करण्यासाठी समित्यांचे गठण करण्यात आले होते. दि.10 मे रोजी आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानीच समितीसाठी वार रूम करण्यात आली.गेल्या सोळा दिवसात या माध्यमातून 395 जणांना मदत मिळवून देण्यात यश आल्याचा दावा आ.सुरेश धस हेल्पलाईन प्रमुखांनी केला आहे.
अशी आहे कार्यपध्दती
आमदार सुरेश धस यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या हेल्पलाईनचा क्रंमाक 8446 12 4024 या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर संबंधित रूग्णांची असलेली अडचणीची नोंद घेतली जाते. त्यानंतर संबधीत रूग्णांना एक तासाच्या आत असलेली अडचण उदा. बेड, रुग्णवाहिका, रेमडेसीवीर इंजेक्शन, सिटीस्कॅन यासह आदी प्रश्न या हेल्पलाईन च्या माध्यमातून सोडविले जातात.
16 दिवसात 395 जणांनी संपर्क
10 मे पासून सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनच्या माध्यमातून आत्तापर्यंत 395 जणांनी संपर्क साधला आहे.या संपूर्ण सेवा कार्यात 187 जणांना बेड, 195 रूग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन, 35 जणांना रूग्णवाहिका तर आष्टी आणि मुर्शदपूर भागात बेवारस रूग्ण म्हणजे एकदा उपचारासाठी आणून रूग्णालयात सोडले आणि नातेवाईक फिरकलेच नाहीत अश्या आथ जणांवर अत्यंसंस्कार करण्यात येऊन एकूण सोळा दिवसात 395 जणांचे हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले आहेत.
Leave a comment