आष्टीच्या शासकीय कोव्हिड सेंटरमधील प्रकार
नगरसेवक संतोष मुरकुटे यांची पोलीसात तक्रार
आष्टी । वार्ताहर
आष्टीच्या शासकीय कोव्हीड सेंटरमध्ये वृद्ध, महिला पुरुषांना नातेवाईक बेवारसपणे सोडून निघून जात असल्याचा धक्कादायक प्रकार आष्टीचे नगरसेवक संतोष मुरकुटे यांनी शनिवारी रात्री उघडकीस आणला आहे. या प्रकरणी त्यांनी आष्टी पोलीसांना तक्रार अर्जही दिला आहे. यामुळे कोरोना काळात नात्यातील लोकच रुग्णाचा किती तिरस्कार करु लागले आहेत हे समोर आले आहे.
आष्टी शहरातील शासकीय आयटीआयमध्ये कोरोणा बाधित रुग्णासाठी सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये गेल्या आठ दिवसापासून काही नातेवाईक वृद्ध महिला वृद्ध पुरुष कोरोना बाधित झाल्यानंतर या ठिकाणी आणून बेवारस सोडत आहेत.व संबंधित दिलेला फोन नंबर हा बंद अवस्थेत असतो तर हे यांच्याकडे डुंकूनही पाहत नाहीत असा धक्कादायक प्रकार आष्टी नगरपंचायतचे नगरसेवक संतोष मुरकुटे यांना शनिवारच्या रात्री 3.50 वाजता पाहावयास मिळाला. संतोष मुरकुटे हे रात्री साडेतीन वाजता या शासकीय कोव्हीड सेंटरमध्ये आपल्या संबंधित पाहुण्यांना रामभाऊ सुरवसे यांना जास्तीचा त्रास झाल्याने त्यांचा त्यांना फोन आल्यानंतर त्या ठिकाणी ते दाखल झाले.त्यावेळी त्या ठिकाणी आष्टी तालुक्यातील पिंपळा गावची एक 65 वर्षीय महिला अक्षरशहा संपूर्ण नग्न अवस्थेत पडली होती.मरण यातना भोगत होती. हा प्रकार पाहिल्यानंतर नगरसेवक संतोष मुरकुटे यांनी आष्टी ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली आहे. अशा बेवारसपणे सोडुन जाणार्या नातेवाईक,अथवा स्वतःच्या आई-वडिल आजी आजोबा यांना कोव्हीड सेंटरमध्ये सोडून त्यांच्याकडे कसलेही लक्ष न देणार्या लोकांवर आता पोलीसांनी कारवाई करावी. अशी मागणी संतोष मुरकुटे यांनी या अर्जाद्वारे केली आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा गावातील हौसाबाई हरिभाऊ हजारे (65) असे या महिलेचे नाव आहे ही महिला वेदना सहन करत होती. हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर संतोष मुरकुटे यांनी डॉक्टर फुंदे यांना वाढवायला या सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यावर डॉक्टर फुंदे म्हणाले की या महिलेला सोडून गेलेल्या नातेवाईकांनी आपला मोबाईल नंबर बंद असलेला दिला आहे. या महिलेकडे गेल्या आठ दिवसापासून कोणी फिरकले सुद्धा नाही असेही त्यांनी सांगीतले. दरम्यान अशाप्रकारे मानवी हृदयाला पाझर फोडणारे हे कृत्य जर कोणी करत असेल अशांना पोलीस प्रशासनाने बेड्या ठोकल्या पाहिजे अशी मागणी संतोष मुरकुटे यांनी केली आहे.
Leave a comment