बीड । वार्ताहर
जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कोविंड 19 आपत्तीमध्ये बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची आढावा बैठक झाली.
Covid-19 या साथ रोगाचा आपत्तीमध्ये बाधित व्यक्तींचे मृत्यू होत असून यामध्ये दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची काळजी घेणे गरजेचे असून यासाठी शासनाने निर्देश दिले आहेत. दोन्ही पालक कोवीड आजाराने गमावल्यामुळे अनाथ झाले आहे आणि त्यास सांभाळण्यासाठी जवळचे कोणीही नातेवाईक नाहीत असे बालक असल्यास त्याबाबतची माहिती बाल न्याय समिती कळविण्यात यावी अथवा 1098 या टोल फ्री क्रमांक द्वारे देखील आपण अशा कोरोना आपत्तीमुळे अनाथ झालेल्या बालकाची माहिती कळवू शकता असे आवाहन यावेळी करण्यात आले
अनाथ झालेल्या बालकांच्या कायदेशिर हक्क व आवश्यक न्यायिक विषयक मदत त्यांना मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत कार्यवाही केली जावी तसेच त्यांचे काळजी व संरक्षणासाठी पोलीस विभागास सूचना देण्यात आल्या.
जिल्ह्यात सद्यस्थितीत आठ बालगृहे आहेत यापैकी एक एच आय व्ही ग्रस्त बालकांसाठी असून या सर्व बालगृहांमध्ये सध्या 169 बालके आहे याच बरोबर बाल संगोपन योजनेतून 450 बालकांना आर्थिक एक मदत दिली जात आहे
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्हि एम हुंडेकर, चाईल्ड लाईन समन्वयक रामहरी जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बालकल्याण) रामेश्वर मुंडे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पिंगळे, प्रकल्प संचालक बालकामगार ओमप्रकाश गिरी, बाल कल्याण समितीचे डॉ. अभय वनवे, तत्वशील कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी एस एस निर्मळ आदी उपस्थित होते
जिल्ह्यातील अशा पीडित पालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थानमध्ये या बालकांना यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्हास्तरावरील सदर कृती दल टास्क फोर्स काम करणार आहे या टास्क फोर्स मध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बाल कल्याण समिती पोलीस विभाग नगरपालिका जिल्हा आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग हिंदी मन तसेच निमंत्रित सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे
जिल्हाधिकारी कार्यालय येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी त्यांनी उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त देशाची अखंडता, व सहिष्णूता यावर निष्ठा ठेवून सर्व प्रकारच्या दहशतवाद, हिंसाचाराचा मुकाबला करण्याची, सर्व मानवजातीत शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकवित मानवी मूल्यांना धोका पोहचविणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु, अशी शपथ दिली.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे , तहसिलदार श्रीराम बेंडे, विधी अधिकारी ॲङ सुनील देशमुख, नायब तहसिलदार आय.पी.सय्यद यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a comment