जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांच्या तक्रारीनंतर सीईओ,सीएस, एसीएसची धाव

बीड । वार्ताहर

येथील जिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचाराबाबत कसे दुर्लक्ष केले जात आहे, याबाबतचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच एक प्रकार गुरुवारी (दि.20) रात्री घडला. कोरोनाबाधित रूग्णाचे ऑक्सिजन बंद पडले. नातेवाईकांनी विनंती केल्यानंतरही हे आपले काम नाही, असे सांगत नर्सने हात झटकले. त्यानंतर नातेवाईकांनी याबाबत तक्रार केली.  त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये हा प्रकार घडला.
वडवणी तालुक्यातील एक 29 वर्षीय तरूण कोरोनाबाधित असल्याने वॉर्ड क्रमांक 6 मध्ये दाखल असून दोन दिवसांपासून त्याला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास ऑक्सिजन बंद होेते पण केवळ तोंडाला मास्क लावलेला होता. त्यामुळे रूग्णाला त्रास सुरू झाला. त्याने हा प्रकार तात्काळ मोबाईलवरून नातेवाईकांना सांगितला. त्यांनी धाव घेतली. येथील सोनाली पवार या परिचारिकेकडे ऑक्सिजन लावण्याची विनंती केली. यावर त्यांनी हे काम वॉर्डबॉयचे आहे, असे सांगून दुर्लक्ष केले. यावर याच वॉर्डमधील दुसरी परिचारिका दीपांजली काळे यांनीही नातेवाईक म्हणतच असतात, आपण दुर्लक्ष करायचे, असे सांगत ऑक्सिजन लावण्यास टाळाटाळ केली. हा सर्व प्रकार मेट्रन संगिता दिंडकर यांना कळवताच परिचारिकांनी  तात्काळ ऑक्सिजन लावले.रुग्णाच्या नातेवाईकांनी या गंभीर प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांना माहिती दिली. कुंभार यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते, डॉ.सुखदेव राठोड यांनी वॉर्डात धाव घेतली. नातेवाईक व परिचारिका यांना समोरासमोर करताच सर्व चुका निदर्शनास आल्या. यावर डॉ.गित्ते यांनी या दोन्ही कंत्राटी परिचारीकांना टर्मिनेट करण्याच्या सुचना डॉ.राठोड यांना दिल्या. परंतू शुक्रवारी उशिरापर्यंत याबाबत आदेश निघाले नव्हते.

गलथान कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना वॉर्डमध्ये जाण्यास बंदी घातली. परंतू आतमध्ये परिचारिका, डॉक्टर रूग्णांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे. आतमधील गलथान कारभारावर विश्वास नसल्यानेच नातेवाईक आत जाण्याचा हट्ट धरत असल्याचे दिसते. आरोग्य विभाग स्वत:च्या गलथान कारभारावर पांघरून घालण्यासाठी पोलिसांना पुढे करत असल्याचा आरोपही नातेवाईकांकडून केला गेला.

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.