शिरुर  / बाळकृष्ण मंगरुळकर
 
 
कोरोनामुळे लागू झालेला लॉकडाऊन व त्यामुळे ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामध्ये आपल्या सभासदांना किमान जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांना जगवणे हा आपला धर्म समजून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा,  नृत्य परिषद व बालगंधर्व परिवार पुणे या संस्थांचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विविध संस्थाना मदतीची हाक दिली होती. 
श्री मिलिंद मेश्राम सभासद असलेली  'रुबीकॉन फाउंडेशन, दिल्ली ही संस्था त्याच हाकेला ओ देऊन धावून आली.
 
रुबीकॉन फाउंडेशन पंधरा वर्षे जुनी संस्था आहे. डॉक्टरांना ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट व कोविड रिलीफ सपोर्ट अश्या प्रकारची सेवा कोरोना महामारीत रुबीकॉन ने पुरवली आहे. या संस्थेचे चेअरमन आहेत धन्य नारायण व ट्रस्टी आहेत श्री. प्ररीर कुमार, ब्रिगेडियर एच. पी. सिंग, ले.जनरल कामथ, श्री. प्रवीण कामथ, श्री. सचिन खेरा.
फायजर, जिमर, बार्कलेज, अपोलो, बकस्टर इ कंपन्या स्पॉन्सर आहेत.
 
मागील आठवड्यात पुण्यातील कलाक्षेत्रातील 500 कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांना किट वाटप करण्यात आले आहे. यामध्ये नाट्य कलावंत, डान्सर्स, लोक कलावंत, अभिनेते, अभिनेत्री, तंत्रज्ञ, कामगार वर्ग, निर्माते यांना ह्या किटचे वाटप राष्ट्रसेवादल येथे करण्यात आले. 
याप्रसंगी अभिनेते माधव अभ्यंकर, निर्माते आनंद पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे, अभिनेते सुनील गोडबोले, राष्ट्रसेवादलाचे मिहीर थत्ते, नाट्य परिषदेचे सुरेश देशमुख, विजय पटवर्धन, अरुण पोमन, दीपक रेगे, चेतन चावडा, मंजुषा जोशी, जतीन पांडे व इ.हजर होते.
 
 

पाच हजार सभासदाना किट वाटप करण्यात येणार!

 
पुणे व पुणे जिल्ह्यातील किमान पाच हजार सभासदाना किट वाटप करण्यात येणार असून
महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून कलावंतांना, तंत्रज्ञाना व कामगार वर्गाला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
तसेच ग्रामीण भागातील कलाकारांना देखील मदत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहोत.
 
- मेघराज राजेभोसले - अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
 
 
ग्रामीण भागातील कलाकारांची परिस्थिती बिकट !
 
-
कोरोनाचा कठीण काळ चालू असून यात सिनेसृष्टी बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
 
- भारतकुमार पानसंबळ - निर्माता.
 
 

ग्रामीण भागातही कलाकारांना मदत मिळावी !

 
सध्या सिनेसृष्टी पूर्णपणे बंद आहे त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून गेल्यावर्षी चित्रपट 
महामंडळाने कोरोनाच्या काळात मदत केली होती त्याच प्रमाणे याही वर्षी मदत करावी अशी मागणी ग्रामीण भागातील कलाकारातून होत आहे.
 
- महेश मंगरुळकर - कलाकार - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सभासद सदस्य.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.