बीड । वार्ताहर
संपूर्ण जगासह देशभरात कोरोना महामारीने हाहाकार निर्माण केला. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये
राज्यातील हजारो कोरोना बाधितांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अलीकडे मृत्यू दरामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते. मयतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते. परंतु या मृत्यु प्रमाण पत्रावर मृत्यूचे कारण स्पष्ट न दिल्यामुळे नातेवाईकांना अनेक लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
कोव्हीड-19 मृत्यू झाल्यानंतर मयताचे मृत्यु प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्यामुळे अनेक मयतांच्या नातेवाईकांना विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी, वैद्यकीय उपचार खर्च प्रतिपूर्ती मिळण्यासाठी अडचन निर्माण होत आहे. तसेच इतर शासकीय लाभ यामुळे मिळत नाहीत. नुकतेच केंद्र शासनाने एक शासकीय आदेश काढून ज्याचा पत्र क्र. 610/01/ 2021-ढउइ आहे त्यात नमूद केले आहे की र्लेींळव-19 मुळे शासकीय कर्मचार्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या जागी अनुकंपा धरतीवर त्याच्या वारसाला शासकीय सेवेत संधी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या कर्मचार्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निकाली निघेल. परंतु मृत्यू प्रमाणपत्रावर र्लेींळव-19 ने मृत्यू झाल्याचा उल्लेखच नसल्याने अनेकांना शासकीय सेवेत नोकरीपासून वंचित राहाण्याची अन्यायकारक वेळ आली आहे. शिवाय अनेक विमा पॉलिसी यापासून त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ही बाब सामान्य जनतेच्या दृष्टीने नुकसान कारक असून या त्रुटीचा प्रशासनाने विचार करावा अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व युवा नेते संभाजी सुर्वे यांनी आज जिल्हाधिकारी मा. रवींद्र जगताप साहेब यांना भेटून दिले आहे.यापुढे कोव्हीड-19 ने मृत्यू पावलेल्या प्रत्येक मयताच्या मृत्यू प्रमाणपत्रावर कोव्हीड-19ने मृत्यू झाल्याचा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच यापूर्वी ज्यांचे मृत्यू झालेले आहेत त्यांच्याही मृत्यू प्रमाणपत्रावर तशी नोंद करून सर्व मयतांच्या नातेवाईकांना पुनश्च मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावे. अशी मागणीही राजेंद्र मस्के यांनी केली आहे.
Leave a comment