*

 

राजकीय पक्षाच्या सहकार्यातून केज तालुक्यातील पहिले सेंटर

शिरुरघाट परिसरातील नागरिकांची होणार सोय

 

केज । वार्ताहर

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जिल्ह्याला मोठा फ टका बसला असून शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे रुग्णांची सोय होण्यासाठी मनसेच्या पुढाकारातून आणि आरोग्य विभागाच्या सहकार्याने शिरुरघाट येथे लताई कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले आहे. केज तालुक्यात राजकीय  पक्षाच्या पुढाकारातून सुरू झालेले हे एकमेव कोव्हिड सेंटर आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि नंतर त्यांची होणारी गैरसोय पाहता केज तालुक्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेे, यासाठी मनसे पुढाकार घेण्यास तयार असून सर्व सहकार्य करण्यात येईल अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणी सतत पाठपुरावाही केला होता. यानंतर शिरुरघाट येथे मनसेच्या पुढाकारातून आणि शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने 8 मे रोजी लताई कोव्हिड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी तहसीलदार मेंडके, मनसेचे जिल्हााध्यक्ष सुमंत धस, आरोग्य अधिकारी आठवले, गटविकास अधिकारी दराडे, राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.तांबडे, लताई कोव्हिड सेंटरचे आरोग्य अधिकारी दोडके उपस्थित होते. लताई कोव्हिड सेंटर येथे 50 बेडची व्यवस्था असून चार डॉक्टर मिळून बारा वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. रुग्णांवर उपचारासोबतच त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी योगा, संगित रजनी, मनोरंजनाचे कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. दरम्यान कार्यक्रमात तहसीलदार मेंडके, गटविकास अधिकारी दराडे यांनी मनसेच्या सहकार्यातून प्रशासनाने लताई कोव्हिड सेंटर सुरू केल्याने शिरुरघाट व परिसरातील रुग्णांची सोय झाली असल्याचे सांगितले. आरोग्य अधिकारी आठवले यांनी शिरुरघाट येथे कोव्हिड सेंटर उभारणे आवश्यक होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने आता रुग्णांची सोय झाली आहे असे सांगितले तर गटविकास अधिकारी दराडे यांनी आरोग्य विभागावर ताण वाढत आहे. यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष कल्याण केदार यांनी केले. सर्वच राजकीय पक्षांसमोर मनसेने आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमास  तालुकाध्यक्ष कल्याण केदार, गोविंद हाके, गुणवंत सांगळे, विक्रम सांगळे, राजेंद्र घोळवे, विजय हंगे, अमोल केदार हे उपस्थित होते.

 

दानशुर लोकांनी मदत करावी : धस

 

या कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस म्हणाले की, केवळ निवडणुकीपुरते मतदानासाठी जनतेसमोर न जाता लोक अडचणीत असतानाही त्यांना मदत करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. आज मनसे या एकमेव राजकीय पक्षाच्या वतीने केज तालुक्यात पहिले कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले.  यासाठी समाजातील दानशुर व्यक्तींनी शक्य असेल तेवढी मदत करावी. यामुळे रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध होतील तसेच राजकीय पक्षांनीही पुढाकार घेऊन कोव्हिड सेंटर सुरू करुन मायबाप जनतेची सेवा करावी असे आवाहन धस यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.