आष्टी । वार्ताहर
इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणार्या रमजान महिन्यात ’रोजा’ला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच पहाटे सहेरी करून रोजा (उपवास) ठेवतात. पत्रकार जावेद पठाण यांचा मुलगा इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेल्या निहाल जावेद पठाण या 9 वर्षाच्या चिमुरड्याने आपल्या जीवनातील पहिला रोजा शुक्रवार दि. 7 मे रोजी पूर्ण केला.
रखरखत्या उन्हात मनात कोरोना सारख्या भयंकर आजाराची भिती आणि पवित्र रमजान बद्दल असणारी प्रबल ईच्छा शक्तीच्या जोरावर दिवशभरात अन्नाचा एकही कण न खाता व पाण्याच्या घोट न पिता जवळपास दिवसाचे चौदा तास उपाशी राहून चिमुकल्या निहाल ने पहाटे चार वाजता उठून आपल्या कुटुंबियांसोबत सहेरी केली होती. मे महिन्याचे कडक ऊन अशात दिवसभर अन्न पाण्या शिवाय हा रोजा त्याने ठेवला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या कुटुंबियांसोबत त्याने रोजा इफ्तारी केली. कमी वयात निहाल याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.पहिला उपवास (रोजा) पूर्ण झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या चिमुकल्या निहाल चा फुलहार करून सन्मान करण्यात आला.
Leave a comment