केज । वार्ताहर
कोरोनाच्या साथीत अहोरात्र रस्त्यावर उभे असणार्या पोलीस कर्मचार्यांना नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या मनिषाताई घुले यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या माध्यमातून मनिषाताई घुले या स्त्रियांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी मेहनत घेत असतात. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्या विविध उपक्रम राबवून महिलांच्या हाताला काम व रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात.
याचाच एक भाग म्हणून मागील वर्षांपासून आरोग्य, स्वच्छता आणि त्यांच्या सोबतच्या पूरक यंत्रणे सोबत रस्त्यावर उभे राहून कोरोना विरूद्धच्या लढाईत अग्रेसर असलेले पोलीस बांधव यांचा कोरोना संसर्गा पासून बचाव करण्यासाठी त्यांना व कुटुंबियांना मास्कची नितांत गरज असल्याने त्यांनी केंद्रातील भगिनीकडून शिवून घेतलेले दुहेरी स्तराचे कापडी मास्कचे वाटप केले.या वेळी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी मनिषाताई घुले यांचे कार्य हे उल्लेखनीय असून संकट प्रसंगी त्या उपेक्षित समाजघटकासाठी करीत असलेले कार्य गौरवास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले.मास्क वाटपाच्या वेळी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे, विजयराज आरकडे, धनंजय कुलकर्णी, सचिव गौतम बचुटे, महादेव गायकवाड, प्रकाश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लांडगे, मधुकर रोडे, मतीन इनामदार, हनुमंत चादर, हनुमंत गायकवाड, मंगेश भोले, रुक्मिण पाचपिंडे, आशा चौरे, राजू गुंजाळ, सिद्धार्थ डोईफोडे, भास्कर सिरसाट, अशोक नामदास, मंगेश भोले, सतीश बनसोडे, दिलीप बनसोडे, नितीन मेटे आदी उपस्थित होते.
Leave a comment