आष्टी। वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले असल्याने मोल मजुरी करून आपले व आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे पोट भरणारे अनेकांचे काम बंद असल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कोरोना काळात गोरगरीब परिवारांना पुणे येथील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई शेख व अनिस क्लासेसच्या माध्यमातून आष्टी येथील खेळकरी समाजातील 75 गरीब कुटुंबातील व्यक्तींना 1 लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूचे शुक्रवारी (ता.07) वाटप करण्यात आले.
एकीकडे शासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाय योजना राबवत आहे. परंतु याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसून येत आहे. लॉक डाऊनमुळे रोजंदारीवर काम करणारे कामगार, खेळ दाखवून रोजीरोटी कमावणारे आनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात गोरगरीब नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक रशिदभाई शेख यांनी अनिस क्लासेसचे संचालक अनिस कुट्टी यांच्या माध्यमातून आष्टी येथील खेळकरी 75 गरीब कुटुंबातील व्यक्तींना 1 लाख रुपयांचे जीवनावश्यक वस्तूंचे शुक्रवारी (ता.07) वाटप करण्यात आले. पुणे येथील अनिस क्लासेसच्या माध्यमातून अनिस कुट्टी हे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला विविध प्रकारची मदत करत असून त्यांच्या माध्यमातून आष्टी येथील गरजुवंताना मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a comment