माजलगाव । वार्ताहर
माजलगाव शहरालगत असणार्या खानापूर येथे माजलगाव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असणारा गुटखा विक्री पाथरी पोलिसांनी गुटका विक्रेत्यावर अचानक मंगळवार दि.4 रोजी रात्री उशिरा छापा टाकला.यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 8 लाख 32 हजाराचा गुटका ताब्यात घेऊन गुटखा विक्रेत्यास ताब्यात घेतले. दरम्यान या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.मात्र या कारवाईत ही तडजोड होऊन 50 लाख रुपयांचा गुटखा असताना केवळ 8 लाख रुपयांचा दाखवला असल्याची चर्चा परिसरात होती.
पाथरी येथे गुटखा विक्री करणार्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली होती.त्या इसमाकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाली की सदरील गुटखा माजलगावच्या गुटखा विक्रेत्याकडून आणण्यात आला होता.या माहितीवरून पाथरी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा नऊ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव (खानापूर)येथे छापा टाकला.यावेळी पोलिसांनी गुटका विक्रेता राजाभाऊ त्र्यंबक गांडगे (वय 32 वर्ष) यास ताब्यात घेतले.दरम्यान यावेळी पोलिसांनी सदरील गुटखा विक्रेत्याच्या गोदामातून 8 भोत (बोर्या) पान मसाला,राजनिवासच्या दोन अप्पेरीक्षा भरून जप्त केल्या. ज्याची अंदाजे किंमत 8 लाख 32 हजार रुपये आहे.
गुटखा पकडला 50 लाखांचा कारवाई मात्र 8 लाख 32 हजाराची
माजलगाव गुटखा विक्रेत्यांचे मुख्य केंद्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याची उलाढाल होत असल्याची ओरड आहे.अख्ख्या परभणी जिल्ह्यात माजलगाववरून गुटका पुरविल्या जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.दरम्यान पाथरी पोलिसांनी या माहितीवरून 2 गाड्या घेऊन माजलगावला छापा टाकला.खानापूरच्या ज्या गोदामात पोलिसांनी ही कारवाई केली त्याठिकाणी पन्नास लाखाच्या पुढे गुटखा साठा असल्याची चर्चा होती. तो सर्व गुटखा पोलिसांनी पकडला असल्याचे परिसरात ऐकायला मिळाले.परंतु मुख्य गुटखा विक्रेत्याशी तडजोड होऊन याठिकाणी पाथरी पोलिसांनी फक्त 8 लाख 32 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
Leave a comment