नवी दिल्ली-
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळण्यास सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डॉक्टर्ससोबत बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना लस मोफत असेल, तर खासगी हॉस्पिटल्समध्ये तुम्हाला यासाठी काही किंमत मोजावी लागेल. लस घेण्यासाठी CoWIN ऍपवर रेजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
कशी कराल लसीकरणासाठी नोंदणी?
1. cowin.gov.in संकेतस्थळावर जा आणि तुमचा मोबाईल क्रमांक टाका
२. मोबाईलवर आलेला ओटीपी दिलेल्या जागेत भरून Verify वर क्लिक करा
३. ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर व्हॅक्सिनसाठीच्या नोंदणीचं पेज उघडेल. इथे तुमची माहिती भरा आणि Register वर क्लिक करा
४. तुम्हाला मोबाईलवर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईल. नोंदणी झाल्यावर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दाखवले जातील. या पेजवर तुम्ही लसीकरणासाठीची अपॉइंटमेंट निवडू शकता.
५. एका मोबाईल क्रमांकावर एकूण ४ लोकांची लसीकरणासाठी नोंदणी करण्याची परवानगी असेल. यासाठी नोंदणी करताना सर्व सदस्यांची माहिती भरणं आवश्यक असेल.
६. आरोग्य सेतू मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखील तुम्हाला नोंदणी करता येऊ शकेल. यासाठी अॅपवर स्वतंत्र लिंक देण्यात आली असून तिथे नोंदणीसाठी तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग अशी माहिती भरून नोंदणी करता येऊ शकेल.
रेजिस्ट्रेशनच्यावेळी तुमच्याकडे खालीलपैकी
एक डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे
- आधारकार्ड
-पॅनकार्ड
-मतदानकार्ड
-ड्रायव्हिंग लायसेन्स
-हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड
-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीम रोजगार कार्ड
-पासपोर्ट
-बँक/पोस्ट ऑफिसकडून जारी करण्यात आलेले पासबुक
-पेन्शन डॉक्युमेंट
१ मेपासून कोविशिल्डची किंमत वाढली!
गेल्या काही दिवसांमधअये केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप तो निर्णय घेण्यात आलेला नाही. बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment