आष्टीच्या ९१ वर्षीय रघुनाथ राऊत यांनी केली कोरोनावर मात
घराचे केले रुग्णालयात रूपांतर
आष्टी : रघुनाथ कर्डीले
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाची लागण होण्याचा धोका लहान मुलं आणि वृद्धांमध्ये अधिक असल्याचं सांगितलं जातंय. परंतु आष्टी येथील कोरोनाची लागण झालेल्या ९१ वर्षीय रघुनाथ राऊत या वृद्धाने कोरोनावर यशस्वी मात केल्याची आश्चर्यकारक घटना आष्टी येथे समोर आली आहे.
मागील एक महिन्यापासून आष्टी तालुक्यात सह शहरांमध्ये कोरोणाने हाहाकार उडवला आहे यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत याशिवाय आष्टीतील कोविड सेंटर व खाजगी रुग्णालय ही फुल्ल झाले आहेत अशातच आष्टी येथील माजी सरपंच नामदेव राऊत यांचे 91 वर्षीय वडील रघुनाथ राऊत यांना कोरोनाने घेरले .यातच खाजगी रुग्णालय व शासकीय रुग्णालय तुडुंब भरलेली असल्याने तेथे वृद्ध वडिलांची सोय होणार नाही याकरिता नामदेव राऊत यांनी स्वतःच्या घरामध्ये त्यांना ऍडमिट केले .घरातील इतर पंचवीस जणांना वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राहण्यासाठी बाहेर हलवले.व घरातच वडिलांची मिनी दवाखाना तयार केला. त्यांना तिथेच ऑक्सिजनची सोय करण्यात आली.
आष्टी येथील ध्रुव हॉस्पिटलचे डॉक्टर सुदाम जरे व श्याम धस यांनी त्यांच्यावर गेली पंधरा दिवस घरीच उपचार केले.घरामध्ये त्यांना ऑक्सिजनची सोय केली. पियुष राऊत,अदित्य राऊत पुतणे नामदेव ,कालीदास मुले यांनी रघुनाथ राऊत यांची योग्य ती काळजी घेत सेवा केली.
91 वर्षे वृद्ध रघुनाथराव यांनी पंधरा दिवसानंतर कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. मंगळवारी त्यांचे अँटीजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत व आता त्यांची तब्येत ठणठणीत बरी झाली आहे.
माझे वडील ९१ वयाचे असून कोरोना मुक्त करण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. डॉ.सुदाम जरे, संचालक शाम धस,डॉ.सचिन धस,स्वप्नील घुले, अमर शिंदे यांनी केलेली रुग्णसेवा ही समाधानकारक आहे. दिवसातून दोन - दोन वेळा भेटी देत त्यांनी उपचार केले.त्यामुळे आष्टी येथील ध्रुव रुग्णालय अभिनंदनास पात्र आहे. यापुढे कोणीही कोरोनाला घाबरू नये योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच बरा होतो.
नामदेव राऊत / मुलगा
Leave a comment