जिल्हा आरोग्य विभागाचे संकेतस्थल कार्यान्वीत
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता रुग्णांच्या नातेवाईकांना खाटा मिळविणे जिकरीचे होऊ लागले आहे. अशावेळी आपल्या जवळच्या कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत याची माहिती मिळावी यासाठी आरोग्य विभागाने एक संकेतस्थळ उपलब्ध केले आहे.त्यावर आपल्या गावाचा पिन कोड टाकून जवळ्याची रुग्णालयातील खाटांची परिस्थिती माहिती करून घेता येणार आहे.
सध्या जिल्हयामध्ये कोविड रुग्ण मोठया प्रमाणात सापडत आहेत. नातेवाईकांना हॉस्पिटल निहाय बेडची उपलब्धता माहिती नसल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते. यामध्ये बराच वेळ जात असून रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होत आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता जिल्हयातील सर्व रुग्णांना कोविड हॉस्पिटल निहाय शिल्लक बेडची अद्ययावत माहिती मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने (कोव्हीड बीड पोर्टल) तयार केले असून हे पोर्टल दर तासाला अपडेट करण्यात येणार असल्याने रुग्णांना शिल्लक बेड संदर्भात अद्ययावत माहिती मिळू शकणार आहे.
बीडच्या आरोग्य विभागाने कोविडबीड या नावाने हे संकेतस्थळ सुरु केले आहे. यात जवळच्या रुग्णालयातील ऑक्सिजनसह,ऑक्सिजन विरहित, आयसीयू,व्हेंटिलेटर आदींच्या उपलब्ध खाटांची माहिती दिली जात आहे. यावरील माहिती प्रत्येक तासाला अद्ययावत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिल्या आहेत. या सुविधेचा रुग्णानानी लाभ घ्यावा असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी म्हटले आहे.
Leave a comment