पोलीस, नगरपंचायत, आरोग्य विभाग उतरला रस्त्यावर
आष्टी : प्रतिनिधी
सोमवारी आष्टी शहरात पोलीस दल ,नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची थेट रस्त्यावरचं अँटिजन चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.तसेच विनाकारण फिरणाऱ्यांस दंडात्मक कारवाई करण्यात आली.
आष्टी शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने काही निर्बंध घालून दिले आहे. दुसरीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. तरीही अनेक जण रस्ताने फिरत आहेत. कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी आष्टीच्या प्रशासनाने वेगळीच शक्कल लढवली असून विनाकारण फिरताना आढळून येणाऱ्यांची रस्त्यावर अँटिजन चाचणी केली जात आहे. सोमवारी पोलीस व आरोग्य विभागाकडून रस्त्यावरच एंटीजन चाचण्या करण्यात आल्या मात्र त्यामध्ये एकही पॉझिटिव्ह आला नाही तर विनाकारण फिरणाऱ्या कडून एक हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
यामध्ये पोलिस निरीक्षक सलीम चाऊस मंडळ आधिकारी सोनाली कदम,शिंगनवाड तलाठी आनारसे ,शरद शिंदे तसेच नगरंचायतचे कुलकर्णी ,म्हस्के, आरोग्य कर्मचारी पीपीइ कीट परीधान करुण तैनात होते. विशेष करून विना मास्क फिरणारे, विनाकारण फिरणारे यांना दंडुका दाखवण्यासाठी पाचारण केलेले दंगल नियंत्रक पथकाचे जवान आदींनी कारवाया केल्या.
Leave a comment