राज्यभरात 15 दिवसांसाठी कोरोनाबाबत नवी नियमावली जाहीर झाली आहे. निर्बंध कडक केल्यामुळे लोक आपल्या गावाला निघाले आहेत. स्थानकावरही जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे.
लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे निर्बंध जाहीर केले. त्यानुसार आज (बुधवारी) रात्री 8 वाजल्यापासून नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा घातल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी आहे. याद्वारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे शहरातील ज्या नागरिकांना गावी जायचं आहे त्यांना आज रात्री 8 वाजेपर्यंतच प्रवास करता येईल.
Leave a comment