मुंबई । वार्ताहर
महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे आज रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रात आज-उद्या कधीही लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवादामध्ये काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील.
गेल्या तीन दिवसांपासून लॉकडाऊन लावण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. लॉकडाऊनबद्दल नियमावली तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 किंवा 8.30 वाजेच्या सुमारास जनतेशी सोशल माध्यमांद्वारे चर्चा करणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतु, लॉकडाऊनची आज घोषणा जरी झाली तरी याची अंमलबाजवणी ही 15 एप्रिलपासून होणार आहे.
उद्या मध्य रात्री 12 वाजल्या नंतर राज्यात कडक लाँकडाऊनची अंलबजावणी सुरू होईल. यावेळी राज्यात लागू करण्यात येणाऱ्या 2.0 कडक लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्या नागरिकांना काय आणि कुठे दिलासा मिळनार हे आज जाहीर होणाऱ्या अधिसूचनेत जाहीर होईल.'
ही अधिसूचना जाहीर होताच लॉकडाऊन कशा पद्धतीचा असेल? कुठल्या गोष्टींना परवानगी असेल? काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? या सर्व गोष्टींची उत्तरे नागरिकांना मिळतील.
राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन करायचा की 21 दिवसांचा लॉकडाऊन करावा यावरुन अनेकांची मते वेगवेगळी होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीतही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाहीये असं म्हटलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसह इतरही नेत्यांची मते जाणून घेतली. ही बैठक पार पडल्यावर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबत एक बैठक घेतली त्यानंतर एक नियमावली तयार करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी राज्यात कडक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊन जाहीर केला. मात्र, कडक निर्बंध लागू करण्यात आले असतानाही राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळेच आता राज्य सरकारने राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Leave a comment