मुंबई:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोना का वाढला याची दोन कारणं आज सांगितली. राज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही कारणं मांडली असून त्यावर उपाय करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लागू केलेला विकेंड लॉकडाऊन आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला होता. लॉकडाऊनबाबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. परंतु त्यांच्या आजूबाजूला कोविडचे रुग्ण असल्याने ते क्वॉरंटाईन आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. म्हणून झूम अॅपवरून आमचं बोलणं झालं. त्यात कोविड आणि लॉकडाऊनबाबत चर्चा झाली, असं राज ठाकरे म्हणाले.
“काल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता आणि लॉकडाउनसंदर्भात भेटण्याची विनंती केली होती. पण त्यांच्या आजुबाजूला अनेक लोक करोनाने पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे तेदेखील क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे झूमवर बोलता येतील असं सांगितलं. आम्ही दोघेच असल्याने आमच्यात काय संभाषण झालं आणि मी काय सूचना केल्या हे जनतेपर्यंत आलं नसतं. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत आहे,” असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.
“राज्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत आहे. हे महाराष्ट्रातच का दिसत आहे यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. खऱ्या गोष्टी लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे. महाराष्ट्र औद्योगिक राज्य असल्याने बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. पश्चिम बंगाल वैगेरे इतर ठिकाणी काही लाटा वैगेरे ऐकिवात नाहीत. महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. आणि त्या राज्यांमध्ये करोना रुग्ण मोजले जात नाहीत. त्यामुळे तेथील आकडे येत नाहीत,” असं सांगत राज ठाकरेंनी ठाकरे सरकारची पाठराखण केली.
“परप्रांतीय जात असताना त्यांची मोजणी आणि चाचणी करण्यासंबंधी मी सूचना केली होती. पण असल्या कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. येत असलेली माणसं मोजलीही नाहीत. त्यामुळे कोण येतंय ,कोण जातंय याचा थांगपत्ता लागणार नसेल तर आज करोना आहे उद्या दुसरं काही असेल. हे दुष्टचक्र थांबणार नाही. आपण बंधन धालत नाही आहोत. हे चित्र चांगलं नाही. त्यामध्ये सर्वांची वाताहत होत आहे,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.
“शाळा बंद, शिक्षण ऑनलाईन पण फी कायम, असं का? शाळांची फी निम्मी करा. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं पाहिजे. खेळाडूंना सरावासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. विशेष गर्दी न होता जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्यायला हवी. ह्या सततच्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने हमीभाव द्यायला हवा,” अशा मागण्या केली असल्याची माहितीही राज ठाकरेंनी यावेळी दिली. “अनेक रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक असून देखील करोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला सरकारने कडक धोरण स्वीकारायला हवं. रुग्णांना बेड मिळायलाच हवेत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
राज ठाकरे यांनी केलेल्या सूचना
उत्पादन : छोट्या व्यापाऱ्यांना उत्पादन करण्यास सांगितलं मात्र विक्री करण्यास मनाई केली. अशा व्यापाऱ्यांसाठी आठवड्यांतून दोन किंवा तीन वेळा दुकानं खुली ठेवण्यास परवानगी दिली.
बँक : लोकांकडे पैसे असतील तर त्यांना बँकांकडे जातील. सरकारने बँकांशी बोलून घ्यावं. बँक सक्तीने पैसे वसूल करत आहेत. नियमावली ३० एप्रिलपर्यंत आहे तोपर्यंत
वीज बिल माफ करणे : व्यायसायिकांना वीज बिल माफी द्यावी, लोकांना दिलासा देणं गरजेचं आहे. निर्बंधांच्या काळातील वीज बिल सरकारने माफ करावं
कंत्राटी कामगार : अनेक कंत्राटी कामगार सरकारने घेतलं होतं. या कामगारांना परत बोलवा, त्यांना महापालिकेत कायमस्वरुपी घ्यावं. कंत्राटी कामगारांच्या विषयाकडे लक्ष द्यावं.
मनोरंजन क्षेत्र, सलून यांनाही आठवड्यातून दोन-तीन वेळा दुकानं सुरु करण्यास परवानगी द्यावी.
क्रीडा क्षेत्र : सराव करणाऱ्या सर्व खेळांडूना परवानगी मिळणं आवश्यक आहे. गर्दी होणार नाही, परंतु सराव करायला मंजुरी मिळावी.
शेतकरी : राज्य सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. एकदा शेतकरी कोसळला तर पुन्हा संकट आपल्यावर येईल.
शाळा : शाळा बंद आहे, तरी फी आकारणं सुरुच आहे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट केलं पाहिजे. विद्यार्थ्यांप्रमाणे शाळांचाही विचार सरकारने करावा.
अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता : राज ठाकरे
सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याविषयी विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, "माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. तर कोणाच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानींच्या घरासमोर पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली हा मूळ विषय. त्याची चौकशी होणार आहे का? कोणीतरी सांगितल्याशिवाय पोलीस असं कृत्य करणार नाही. चौकशी अनिल देशमुखांची होईलच, पण ही गाडी कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली याची चौकशी व्हावी."
बदलीनंतर परमबीर सिंहांना 100 कोटींचा साक्षात्कार? राज ठाकरेंचा सवाल
अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्याविषयी राज ठाकरे म्हणाले की, "परमबीर सिंह यांना 100 कोटींचा साक्षात्कार त्यांच्या बदलीनंतर का झाला? बदली झाली नसती तर हा साक्षात्कार झाला नसता का? पण ते बोलले बारमधून पैसे गोळा करा, हे लांच्छनास्पद आहे. बदल्यांचे बाजार होतातच."
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या सूचना
छोटे उद्योजक, व्यापारी यांना उत्पादन करण्यास सांगितलं आणि विक्रीवर बंदी आणली, मग त्यासाठी आठवड्यातून किमान २-३ दिवस छोटे व्यापारी, दुकानं उघडी ठेवली पाहिजे.
लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहे, लोकांकडे पैसे नाही. त्यात बँका कर्जासाठी दबाव टाकत आहे. अनेक ठिकाणी सक्तीनं लोकांकडून पैसे वसूल केले जात आहे. त्याबाबत बँकांना सूचना द्यावी
सरसकट लॉकडाऊन काळात वीजबिल माफ करणे, व्यावसायिकांना ५० टक्के जीएसटी करात सवलत द्यावी यासाठी केंद्र सरकारशी बोलावं, लोकांना दिलासा देणं महत्त्वाचं आहे. सतत लॉकडाऊन लावणं योग्य होणार नाही.
कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळात घेतलं. पण कोरोना लाट ओसरली त्यानंतर त्यांना कामावरून काढून घेतलं. या कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं पण त्यांना काढू नये.
क्रिडा, मनोरंजन क्षेत्रात जे कलाकार, खेळाडू यांच्यासाठी सवलत असणं गरजेचे आहे. सराव करण्यासाठी परवानगी द्यावी. सरकारच्या तिजोरीची अवस्था सगळ्यांना माहिती आहे. पण शेतकऱ्यांना हमीभावासाठी पैसे द्यावेत
शाळा बंद आहेत मग फी आकारणी का होतेय? शाळांनी फी घेऊ नये. मुलांचं वर्ष फुकट जात आहे. १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढे ढकललं पाहिजे. लहान मुलांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. १० वी, १२ वी परीक्षा न घेता त्यांना पास करावं. विद्यार्थ्यांचा विचार करताय तसा शाळांमधील कर्मचाऱ्यांचाही विचार व्हावा अशा विविध मागण्या राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केल्या आहेत
Leave a comment