अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील
राज्याचे नवे गृहमंत्री होण्याची शक्यता : सूत्र
मुंबई। वार्ताहर
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. पण, सरकारला जे जरी उशिरा सुचले असेल पण आणखी अनेक राजीनामा घेतल्यावरच दुरुस्त म्हणता येईल, असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर एकच भडीमार सुरू केला आहे. पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून ठाकरे सरकारला चांगलाच टोला लगावला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. देर आये पर दुरुस्त नहीं आये ', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.
दरम्यान, 'सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही गृहमंत्रिदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात एवढ्या भयानक घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत का नाहीत, त्यांचे मौन अस्वस्थ करणारं आहे' अशी खोचक टीका भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
'परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. त्यानंतर हे अपेक्षितच होतं की राजीनामा आवश्यक होता. हा राजीनामा उशीरा झाला आहे, तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, पण आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असला तरी एका गोष्टीचं मला कोडं आहे, अनेक भयानक गोष्टी राज्यात झाल्या आहे. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे. सचिन वाझे काय लादेन आहे काय, ही त्यांची शेवटची प्रतिक्रिया आहे. त्यामुळे त्यांनी आता बोललं पाहिजे, असा सणसणीत टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
शरद पवारांच्या “सेफ गेम”ची मराठी माध्यमांमध्ये चर्चा; गृहमंत्रीपदासाठी वळसे पाटलांचे नाव पुढे!!
अनिल देशमुखांच्या राजीनामा पत्रात जरी नैतिकतेची भाषा असली, तरी सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेणे शरद पवारांना भाग पडले. शिवाय आता सीबीआयच्या टीमपुढे अनिल देशमुख कोणाची नावे घेणार…
१०० कोटींच्या खंडणीखोरीच्या लपेट्यात कोण येणार अशी टांगती तलवार असताना त्याची चर्चा करण्याऐवजी पवारांच्या सेफ गेमची चर्चा सुरू करून पवारांची मीडिया इकोसिस्टिम कार्यरत झाल्याची झलक मराठी माध्यमांनी दाखविली आहे.
दिलीप वळसेंवर माध्यमांची स्तुतिसुमने
पवार हे सेफ गेम म्हणून दिलीप वळसे पाटील यांचे गृहमंत्री म्हणून पुढे करण्याची जोरदार चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. दिलेली जबाबदारी चोखपणे बजावणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
शिवाय आतापर्यंत तरी वादापासून दूर राहणे त्यांना जमलेलं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती आहे.
वळसे – अजित पवार सुप्त संघर्षाचे काय…
यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाची खुर्ची दिलीप वळसे पाटील यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. राष्ट्रवादीसाठी ते कायमच संकटमोचक ठरले. ते दिलीप वळसे पाटील हेच सध्या गृहमंत्रिपदासाठी योग्य पर्याय ठरू शकतील,
असा मतप्रवाह राष्ट्रवादीत निर्माण झाल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केले आहे. सचिन वाझे प्रकरणावरून राज्य सरकारबरोबरच राष्ट्रवादीची मलीन झालेली प्रतिमा वाचवण्यासाठी शरद पवार यांच्याकडून वळसेंचे नाव पुढे येतेय, असे मराठी माध्यमांचे म्हणणे आहे.
पण त्यावेळी अजित पवारांशी झालेल्या सत्तास्पर्धेतून वळसे पाटलांना उपमुख्यमंत्रीपदाऐवजी विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले होते, याकडे मराठी माध्यमांनी बातम्या देताना सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे.
Leave a comment