ज्ञानोबाराव कुटे यांचे निधन
बीड | वार्ताहर
गेल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून व्यवसायात असलेल्या कुटे ग्रुपचे संस्थापक ज्ञानोबाराव कुटे (८५) यांचे वृध्दापकाळाने गुरूवार (दि.१) रोजी सोलापुर येथे उपचारादरम्यान निधन झाले. गुरूवारी उशीरा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर तिरूमला रिफायनरी, मोची पिंपळगाव रोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्री ज्ञानोबाराव कुटे यांनी कुटे उद्योग समुहाची मुर्हूतमेढ ५० वर्षांपुर्वी कापड दुकानाच्या माध्यमातून रोवली होती. पुढे त्यांचा मुलगा सुरेश ज्ञानोबाराव कुटे आणि सौ. अर्चना सुरेश कुटे यांनी या उद्योग समुहाला जगाच्या पटलावर आणले. वारंकरी सांप्रादायाची परंपरेत वाढलेले श्री. ज्ञानोबाराव कुटे यांनी अखेरपर्यंत निभावली. माथी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि पांडुरंगाचे नामस्मरण करत असतं. त्यांच्या निधनाने कुटे ग्रुपचा आधारवड कोसळला आहे. शुक्र वारी सकाळी तिरूमला रिफायनरी, मोची पिंपळगाव रोड येथे त्यांच्यावर कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाचे संकट असल्यामुळे कुटे परिवार प्रेम करणाऱ्या सर्व स्नेहीजनांनी घरामध्येच स्व. ज्ञानोबाराव (आण्णा) यांना श्रध्दांजली अर्पण करावी असे आवाहन कुटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे आणि कुटे ग्रुप परिवार आहे.
Leave a comment