उद्यापासून नवे दर लागू होणार

 

 

 

गेल्या दोन महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागलेला सिलिंडर अखेर स्वस्त

 

 

मुंबई :

गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वारंवार वाढ होत होती. त्यातच पेट्रोल-डिझेलच्या भावातही वाढ होत होती या सर्वांमुळे सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत होता. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे. कारण, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने सांगितले की, त्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती १० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे दर हे १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहेत.

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या दरात बदल होत असतो. गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १२५ रुपयांनी वाढ झाली होती. ४ फेब्रुवारी रोजी सुद्धा एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर १५ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ झाली, मग २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा २५ रुपयांनी वाढ झाली आणि मग १ मार्च रोजीही दरवाढ झाली होती.

सध्या १४.२ किलोग्रॅमच्या नॉन सबसिडी गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत ८१९ रुपये, मुंबईत ८१९ रुपये, कोलकातामध्ये ८४५.५० रुपये आणि चेन्नईत ८३५ रुपये मोजावे लागत आहेत. आता १ एप्रिलपासून नवे दर लागू झाल्यावर नॉन सबसिडी घरगुती गॅस सिलिंडरसाठी दिल्लीत ८०९ रुपये, मुंबईत ८०९ रुपये, कोलकातामध्ये ८३५.५० रुपये आणि चेन्नईत ८३५ रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

गेल्या २ महिन्यांत सिलिंडर १२५ रुपयांनी महागला

गेल्या काही दिवसांपासून घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरांत सातत्यानं वाढ सुरू होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्वयंपाकाच्या सिलिंडरची किंमत १२५ रुपयांनी वाढली. ४ फेब्रुवारीला सिलिंडरची किंमत २५ रुपयांनी वाढली. त्यानंतर १५ फेब्रुवारीला सिलिंडरचा दर ५० रुपयांनी वाढला. २५ फेब्रुवारीला २५ रुपयांची, त्यानंतर १ मार्चला २५ रुपयांची वाढ झाली. 

 

 

पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात होण्याची शक्यता

सूत्रांच्या मते, येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात सातत्याने घसरण होत आहे आणि त्यामुळेच येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.