जिल्हाधिकारी रवींद्र जगताप , उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांची माहिती
बीड । वार्ताहर
जिल्ह्यात शुक्रवारपासून 4 एप्रिलपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या बाहेरगावी जायचं असेल किंवा बाहेर गावाहून यायचं असेल तर त्यासाठी संबंधित तहसीलदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल त्यानंतर नागरिकांना प्रवासासाठी पास दिला जाईल. त्यानंतर नागरिकांना बाहेरगावी जाता किंवा येता येईल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र जगताप आणि उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे.
याबाबत अर्जाचा फॉरमॅट प्रशासनाने उपलब्ध करुन दिला आहे. शिवाय संबंधित तहसीलदारांचे ईमेल आयडीही उपलब्ध करुन दिलेले आहेत. बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाने 25 मार्चच्या रात्री बारापसून ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे .याकाळात कोणाला जर बाहेरगावी जायचे असेल किंवा बाहेर गावाहून यायचे असेल तर त्या त्या तालुक्याच्या तहसीलदार यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत प्रवासाचे कारण,अँटिजेंन टेस्ट किंवा आरटीपीसीआर केल्याचा अहवाल सोबत जोडून द्यावा लागणार आहे,तसेच प्रवास करणार्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड किंवा ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे
Leave a comment