भाजप,सेनेसह अपक्ष मोदीही विजयी

 

बीड | वार्ताहर

 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल रविवारी (दि.21) दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केला. डिसीसी बँक आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. मतदानामध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास आघाडीला ५ जागा मिळाल्या असून महिला राखीव जागेवर महाविकास आघाडीच्या पॅनलला महिला उमेदवारच मिळाले नव्हते.या ठिकाणी भाजप आणि शिवसेना नेते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाला फायदा झाला आहे.याबरोबरच अपक्ष उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

 

जिल्हा बँकेच्या 8 जागांसाठ शनिवारी 11 मतदान केंद्रावर सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान झाले होते. एकूण 1382 पैकी 816 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी लोकशाही पायदळी तुडविल्याचा आरोप करत भाजपने मतदानापूर्वीच या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे बँकेच्या आठ संचालक जागांसाठी केवळ 58.32 टक्के मतदान झाले होते, मात्र अशा स्थितीतही महाविकास आघाडीला महिला राखीव जागेवर उमेदवार मिळाले नव्हते. या ठिकाणी 1 भाजप तर 1 क्षीरसागर गटाचा उमेदवार बहिष्कार असतानाही निवडून आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान पार पडले. त्यानंतर रविवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली.दुपारपर्यंत सर्व निकाल हाती आले.

 

मतदारसंघ निहाय विजयी उमेदवार

 

1)इतर शेती संस्था मतदार संघ अमोल आंधळे यांना 223 मते मिळाली. ते 212 मतांनी विजयी झाले तर त्यांच्याविरोधात धनराज राजभाऊ मुंडे यांना 8 मते मिळाली.

 

2) कृषी प्रक्रिया मतदार संघात भाऊसाहेब नाटकर 41 मतांनी विजयी

3)पतसंस्था मतदार संघ- राजकिशोर पापा मोदी 93 मते घेऊन विजयी. गंगाधर आगे यांना 36 मते मिळाली.

4)जिल्हा बँकेच्या ओबीसी मतदार संघातून कल्याण आखाडे 716 मतं मिळवत विजयी

5) अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघात रवींद्र दळवी 720 मते मिळवून विजयी झाले तर एकूण मते 805 इतकी होती

6) जिल्हा बँकेच्या महिला राखीव मतदारसंघात सुशीला शिवाजी पवार यांना 234 मतं मिळाली. त्या विजयी झाल्या

7) कल्पना दिलीप शेळके यांचा 174 मते घेऊन उमेदवार विजय

8) परळी येथील प्रयागाबाई साबळे यांना केवळ 118 मते, बाद मतांची संख्या विजयी उमेदवार यांना पडलेल्या मतांपेक्षा अधिक आहे

9) जिल्हा बँक विमुक्त जाती जमाती मतदार संघ - सूर्यभान मुंडे विजयी

इतक्या जागांवर विजय -

महाविकास आघाडी शेतकरी विकास पॅनल-05

सुरेश धस गट भाजप - 01

शिवसेना क्षीरसागर गट - 01

अपक्ष - 01

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.