मुंबई
मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत. देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी गोळा करायला सांगितले होते, असा आरोप करत सिंग यांनी खळबळ उडवून दिली आहे. पण, ज्या पत्रावरून राज्यात एवढी मोठी खळबळ उडाली. त्या पत्रावरच शंका उपस्थित केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडू पत्राबात शंका उपस्थित करण्यात आली होती. पण यावर आता परमबीर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
परमबीर सिंग यांना एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना तो ई मेल माझाच आहे, असं सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेला मेल हा माझ्याच ई-मेल आयडी वरून पाठवला आहे, असं स्पष्टीकरण परमबीर सिंग यांनी दिलं आहे. परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणामुळे हे प्रकरण चांगलंच तापणार आहे. तसंच परमबीर सिंग यांच्या स्पष्टीकरणावर मुख्यमंत्री कार्यलय काय उत्तर देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a comment