बीड । वार्ताहर

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शिर्षकाअंतर्गत विविध कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची

एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाव्दारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार असल्याचे संचालक,विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय,महाराष्ट्र शासन पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

सन 2021-2022 करिता अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे या प्रक्रियेमध्ये शेतक-यांनी सन 2020-2021 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे परंतु त्यांची कोणत्याही योजनेसाठी निवड झालेली नाही ते

शेतकरी त्यांच्या अर्जातील बाबींमध्ये बदल करु शकतील असे अर्ज सन 2021-2022 करिता ग्राह्य धरले जातील. त्यकरिता त्यांच्याकडून पुन्हा शुल्क आकारले जाणार नाही. सन 2021-2022 करिता वरील अर्जातील ज्या बाबींचा

अर्जामध्ये विनाशुल्क समावेश करता येईल. महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतक-यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्दारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्येक्ष लाभ मिळेपर्यंत

एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे शेतक-यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतक-यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

महाडीबीटी पोर्टल हे संकेतस्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतच्या मोबाईल, संगणक,लॅपटॉप,टॅबलेट,सामुदायिक सेवा केंद्र (उडउ) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातुन

उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणा-या सर्व शेतक-यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रामणित  करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल

त्यांनी प्रथम आधार नोंदणीकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये

त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. या कामासाठी त्यांनी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता

तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यस हशश्रविशीज्ञवलींषरीाशीसारळश्र.लेा या ईमेलवर किंवा 02025511479 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.