मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. अटकेपूर्वी तब्बल 13 तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड विधानाच्या २८६, ४६५, ४७३, ५०६ (२), १२० ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

वाझे यांच्यावरील अटकेच्या कारवाईने एकच खळबळ उडाली असून हा राज्य सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. वाझे यांच्यावर या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. वाझे यांना निलंबित करून अटक करा अशीही मागणीही त्यांनी केली होती. मात्र, आधी चौकशी मग शिक्षा असा पवित्रा घेत सरकारने वाझे यांची केवळ खात्यांतर्गत बदली केली होती. आता वाझे यांना एनआयएने अटक केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे

 

एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३०च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १3 तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे. वाझे यांना रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता वाझे यांना एनआयएच्या सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, वाझे यांच्या अटकेमुळे पोलीस दलासह मुंबई पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली असून वाझे यांनी कोणाच्या सांगण्यावरून २५ फेब्रुवारी रोजी स्फोटकयुक्त गाडी ठेवली होती. याचा तपास आता एनआयए करणार आहे. वाझे यांना निलंबित करावे आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपने विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा लावून धरला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी वाझे यांना निलंबित करण्यासाठी मागणी लावून धरली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाझे म्हणजे ओसाम बिन लादेन आहे का असा सवाल करत वाझेंची पाठराखण केली होती. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर महाविकासआघाडी याबाबत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

आणखी तीन अधिकारी, कर्मचारी

यांचा समावेश असण्याची शक्यता

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना अटक केली आहे. या प्रकरणात एकूण 5-7 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आणखी तीन अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सचिन वाझे यांच्या शिवाय आणखी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.  एनआयएने रात्री उशीरा पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार टो करून आणली आहे. एक इनोव्हा कार 25 फेब्रुवारीला म्हणजे त्याच दिवशी मुलुंड टोल नाक्यावर सीसीटीव्हीमध्ये दिसली होती. एनआयए कार्यालयात रात्री आणण्यात आलेली इनोव्हा कार  तिच आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच इनोव्हा गाडीतून जाणाऱ्या तिघांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएची तीन पथकं रवाना झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाचा समावेश आहे. 

सचिन वाझेंच्या हाताला सलाईन

सचिन वाझेंना एनआयए ऑफिसला परत आणलं,  मध्यरात्री त्यांना कार्यालयातून नेण्यात आले होते,  त्यांना सकाळी परत कार्यालयात आणलं. यावेळी सचिन वाझेंच्या हाताला सलाईन लावलेलं दिसून आलं. त्यांना रात्री हॉस्पिटलला नेलं असावं अशी शक्यता 

'ती' इनोव्हा कार मुंबई पोलीस आयुक्तालया जवळून घेतली ताब्यात!

 मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणाचा राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए ) ने मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक  केली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. जी इनोव्हा गाडी एनआयएच्या टीमने ताब्यात घेतली आहे, ती मुंबई पोलिसांची  असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही शनिवारी रात्री मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या जवळून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ही कार गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. त्यामुळे या कार मागे पोलीस कनेक्शन बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी पोलिसांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

 

कोण आहेत सचिन वाझे?

 

 

सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.

 

नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.

 

सचिन वाझे करीब 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.

 

वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.

 

सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.

 

सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.

 

30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.

 

2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले होतेे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.