परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या

पुणे । वार्ताहर

 

लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा -२०२० पुढे ढकलण्यात आली होती. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांनी रस्त्त्यावर उतरुन आंदोलन केले होते. दिवसभराच्या गदारोळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शनिवारी परीक्षेचा तारीख जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. यानुसार लोकसेवा आयोगाने सुधारित प्रसिद्धी पत्रक जाहीर करत येत्या २१ मार्चला एमपीएससीची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

यानुसार आज एमपीएससीची MPSC Exam Date तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

राज्यात कोराेनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने परीक्षा घेणे योग्य नाही, असे राज्याच्या पुनर्वसन विभागाने कळविल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली. गेल्या वर्षभरापासून ही परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभर निदर्शने केली. पुण्यात शेकडो विद्यार्थी नवी पेठेत ठिय्या देऊन बसल्याने या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तो वेळीच अटोक्यात आणला. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलण्यात आली होती. प्रस्तुत परीक्षा रविवार, दिनांक २१ मार्च, २०२१ रोजी आयोजित करण्यात येईल, असे आयोगाने जाहीर केले आहे. 

याचबरोबर शनिवार, दिनांक २७ मार्च, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा-२०२० तसेच रविवार, दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या पत्रकात आणखी दोन सूचना आयोगानं दिल्या आहेत

  • 14 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेसाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवाराला प्रवेश देण्यात येईल.
  • 27 मार्च 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 तसंच, 11 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या दोन्ही परीक्षा नियोजित तारखेलाच घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेल नाही.

 

काल नेमकं काय घडलं

राज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने  पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले. 

 

गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

 

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.