आष्टी / वार्ताहर
कडा येथील गांधी हाॅस्पिटलचे नुतनीकरण आणि डॉ. गांधी व डॉ. मोहरकर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीत कक्षाचा उद्घाटन सोहळा माजी आमदार भिमराव धोंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोविडचे नियम पाळून पार पडला.
डॉ. अशोक गांधी यांनी १९८० साली कडा व परिसरातील रुग्णांसाठी रुग्ण सेवेला सुरुवात केली असून अनेक जणांचे त्यांनी प्राण वाचवले आहेत.आता त्यांनी अत्याधुनिक मशिनरी व अत्याधुनिक आयसीओ बेड रुग्णसेवेसाठी सज्ज ठेवले आहेत. त्यांनी त्यांच्या दीर्घ अनुभवाचा व रुग्णसेवेचा वसा यापुढेही सुरू ठेवावा असे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले.
कडा येथील गांधी हॉस्पिटल आणि मोहरकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीकरण करण्यात आले आहे. रुग्णांना आता सर्व प्रकारच्या सुविधा कडा येथे मिळणार आहेत त्यामुळे आता उपचारासाठी अहमदनगर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. गांधी हाॅस्पिटलचे नुतनीकरण आणि डॉ. गांधी व डॉ. मोहरकर यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदक्षता विभाग विस्तारीत कक्ष आजपासून रुग्णसेवेसाठी सुरू करण्यात आला आहे.यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे , माजी जिल्हा परिषद सभापती उद्धव बाप्पू दरेकर, ऍड.वाल्मीक तात्या निकाळजे, ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमजान तांबोळी, सरपंच अनिल तात्या ढोबळे, उपसरपंच संपत कर्डिले, संजय ढोबळे, हृदयरोग तज्ञ डॉक्टर धनंजय वारे, डॉक्टर माधव चौधरी, माजी उपसरपंच योगेश भंडारी, कांतीलाल चाणोदिया, हेमंत शेठ पोखरणा, संजय मेहेर, योगेश चाणोदिया, प्रफुल्ल पोखरणा, शंकर देशमुख, संभाजी कर्डिले आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिदक्षता विभागात या मिळणार सोयीसुविधा
ह्दय विकार, सर्पदंश, पक्षाघात, विषबाधा,दमा,उच्च रक्तदाब, अनियंत्रित साखर तसेच ट्रामा आसीयुमध्ये अपघात, डोक्याला इजा, हाडे फ्रॅक्चर इत्यादी वर उपचार केले जातात. तसेच डिजीटल एक्सरे, अल्ट्रा सोनोग्राफी, इसीजी इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन मशिन,पल्स ऑक्सिमीटर, मल्टीपॅरामाॅनिटर, व्हेंटिलेटर, डीफीब्रीलेटर, सिरीज पंप, सेंट्रल आॅक्सिजन,अॅम्बुलन्स , सुसज्ज आॅपरेशन थिएटर, प्रसुती गृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ विमा धारकांसाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत असेही डॉ. उमेश गांधी व डॉ.मोहरकर यांनी सांगितले.
Leave a comment