राज्यपालांच्या हस्ते मुंबईत संपन्न झाला पुरस्कार सोहळा
अंबाजोगाई / प्रतिनिधी
मराठवाड्
सागा फिल्म फाऊंडेशन समाजसेवा संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कर्तृत्ववान लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो. मागच्या सात वर्षापासुन ही परंपरा संस्थेने चालवताना यंदाही नामांकित 11 लोकांना पुरस्कार दिला. ज्यामध्ये राष्ट्रीय संत भैय्यु महाराज यांना मरणोत्तरही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजाच्या सर्व क्षेत्रात दिलेले योगदान, तरूणांच्यासाठी केलेलं मार्गदर्शन, राष्ट्रहित आणि शेवटच्या माणसासाठी केलेलं कार्य या निकषावर पुरस्कारकर्त्यांची निवड संस्था करते. त्या अनुषंगाने शेटे यांची निवड करण्यात आली होती. शनिवारी मुंबईस्थित राज्यपाल भवनात महामहिम राज्यपाल श्रीमान कोशारी यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला खा.उदयनराजे भोसले, केंद्रिय मंत्री रामदासजी आठवले, युवराज होळकर यांच्यासह असंख्य खासदार, आमदारांची उपस्थिती होती. भाशिप्र संस्था परिवारात मिळालेला हा पुरस्कार खऱ्या अर्थाने संस्थेचा नावलौकिक वाढवणारा असुन शेटे यांच्या कार्याचा आम्हाला गौरव वाटतो या शब्दात संस्था अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी प्रतिक्रिया दिली. शेटे साहेबांचे योगदान सामाजिक कार्यात मोठ्या प्रमाणावर आहे. या शब्दात सहकार्यवाह प्रा.चंद्रकांत मुळे आणि डॉ.हेमंत वैद्य यांनी आपल्या अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या. संस्था कोषाध्यक्ष विकासराव डुबे, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, डॉ.सौ.कल्पनाताई चौसाळकर, आप्पाराव यादव, अमरनाथ खुरपे, विष्णुपंत सोनवणे, बाबुराव आडे यांच्यासह स्थानिक मंडळाचे अध्यक्ष ऍड. किशोर गिरवलकर, कार्यवाह बिपीनदादा क्षीरसागर, माध्यमिक शाळेच्या अध्यक्षा सौ.शरयुताई हेबाळकर, डॉ.अतुल देशपांडे, राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रभारी डॉ.मुकुंद देवर्षी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना शेटे म्हणाले की, मला मिळालेला पुरस्कार भाशिप्र संस्थेचा सन्मान असुन सामाजिक संवेदना, राष्ट्रहित आणि समर्पण सेवाभावी वृत्तीतुन मी कर्तव्य आणि जबाबदारीतुन काम करत असतो. हा पुरस्कार चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह वाढवणारा निश्चित आहे या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली
Leave a comment