बीड । वार्ताहर

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. गेल्या वर्षभरापासून राज्य सरकार कोरोनाशी लढा देत आहे. मात्र, त्यामुळे सरकारची तिजोरी रिकामी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी बीड जिल्ह्यातील सात माजी विधिमंडळ सदस्यांनी एक महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा जगभरात हाहाकार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य, महसूल, प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी समाज सेवी संस्थांनी पत्रकारांनी यासाथीला रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर या कोरोना साथीमध्ये अनेकांनी एकमेकांना मदतही केली आहे.


राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी विधिमंडळाच्या माजी सदस्यांच्या समन्वय समितीने माजी विधिमंडळ सदस्यांनी एका महिन्याचे निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याबाबत कळवले होते.त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील माजी विधिमंडळ सदस्य मोहनराव दिगांबरराव सोंळके 50 हजार, दिगांबरराव किसनराव देशमुख 64 हजार, पृथ्वीराज शिवाजीराव साठे 50 हजार, केशवराव आंधळे 50 हजार, शिवाजीराव पंडित 70 हजार, सुरेश नवले 72 हजार, नंदकिशोर मुंदडा 40 हजार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला धनादेशाद्वारे निवृत्तीवेतन दिले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.