कर्हेवडगाव परिसरात दहशत
आष्टी । वार्ताहर
तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने दहशत निर्माण केली होती.त्यानंतर आता तालुक्यातील कर्हेवडगांव येथील टकले वस्ती शेजारील शेतामध्ये शेतकर्यांना गव्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून याभागात विशेष लक्ष ठेवून आहे.
कर्हेवडगांव येथील शेतकरी राम नागरगोजे,अंबादास बांगर,जालिंदर नागरगोजे,विजय विधाते हे शेतातून रविवार दि.28 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या दरम्यान ज्वारी काढून परतत असताना टकले वस्तीजवळील भागिनाथ टकले यांच्या शेतात असलेल्या कपाशी मध्ये अचानक मोठा प्राणी समोर दिसला प्रचंड घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी कधी न पाहिलेला प्राणी दिसल्याने गाडीवरून तीघे असल्याने लांबून त्यांनी गाडीच्या उजेडात मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले असून हे व्हिडिओ वनविभागाला पाठवले असून घटनास्थळी वनविभागाचे पथक रवाना झाले आहे. या भागात विषेश लक्ष ठेवून आहे.
गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे. या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी वनरक्षक मातावळी एन.के.काकडे,वनरक्षक आष्टी डी.जे.चव्हाण,चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
वनविभागाचे सतर्कतेचे आवाहन
पोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये शिरला असून गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र जमून मागे न लागता गोगांटा टाळावा गव्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे वनविभागाची गाडी पेट्रोलिंग करेल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.पाळीव प्राण्यांसह नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आष्टीचे वन परिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी केले आहे.
Leave a comment