गरिबांच्या जगण्याचे वांदे पोस्टिंग
फेसबुकवर नोंदवल्या गेल्या 24 हजार पोस्ट !
बीड । वार्ताहर
लॉकडाऊनमध्ये फावते 2 नंबर वाल्यांचे...मरण येते गरिबांचे...म्हणून आता नोलॉकडाऊन. कुणाची भीती सरकारच्या मनाला लागली. जी अचानक लॉकडाऊनची आठवण झाली? गोरगरीब लॉकडाऊनमध्ये उपाशी मरतील तरीही त्यांना देणेघेणे नाही? उद्धवा शेतकर्यांसाठी एकत्र आलाव मग कामुन शेतकर्यांचा मुळावर लॉकडाऊन थोपवताव?आम्ही नियम पाळू, नियमबाह्य बाबी टाळू मात्र तुम्हीदेखील लॉकडाऊन टाळा ! अशा प्रश्नांचा भडीमार करणार्या पोस्ट बीडकरांनी गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 वेळेत पोस्ट केल्या.
सामान्य लोकांचे जगणेच बंद होणार असेल जीवाची भीती कसली असा सवाल उपस्थित करून लॉक डाऊन नाकारणारी मोहीम हजारो युजर ने लाईक केली. यामध्ये जवळपास 24 हजार पोस्ट एकट्या फेसबुक साईटवर होत्या. नियम पाळू मात्र लॉकडाऊन टाळू असा रोख या मोहिमेतून समोर आला.यासाठी शेतकरी,लहान व्यापारी उद्योजक आदींच्या मुलांनी हि चळवळ शासन प्रशासन पर्यंत पोहचवली.सतत गरज नसताना लॉकडाऊन करून व्यावसायिकांचा गळा आवळणे बंद करा. नुकसानभरपाई देणार असाल तरच लॉकडाऊन करा.जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा जगला तरच देश जगेल त्यामुळे आता परत लॉकडाऊन नको अशा भावना युवकांनी व्यक्त केल्या.
Leave a comment